मजुरांच्या पोटात दोन घास दिल्याचे समाधान - आ.निलेश लंके

0
प्रतिनिधी / पारनेर
   पारनेर तालुक्यातील निघोज येथे उदरनिर्वाहासाठी मराठवाड्यातील अनेक शेतमजूर सहकुटुंब अनेक दिवसांपासून निघोज परिसरामध्ये वास्तव्यास असून मिळेल त्या ठिकाणी ते शेती काम करत असतात परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन असल्याने सर्व व्यवसाय व शेतीची कामे बंद झाल्याने त्या शेत मजुरांवर राहण्याचा व दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उपस्थित झाला.त्यामुळे निघोज येथील संदीप वराळ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ यांनी स्थानिकांच्या मदतीने खाजगी मंगल कार्यालयात मजुरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. पाच दिवसांनंतर प्रशासनाने मजुरांची दखल घेत त्यांना मुलीकादेवी विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रात त्यांना नेले.पाच दिवस गावकऱ्यांनी मजुरांना सकाळचे व संध्याकाळ चे जेवण वेळेत दिले होते.तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्या मजुरांना जेवण देण्याची जबादारी घेतली असता मजुरांना संध्याकाळचे जेवण हे दिले नसल्याने सचिन वराळ यांनी आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क करून मजुरांची जेवणाची सोय करण्यास विनंती केली अशी माहिती संदीप वराळ फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन वराळ यांनी दिली.

        मजुरांना जेवण मिळाले नसल्याची माहिती रात्री उशिराने मिळाल्याने आमदार निलेश लंके यांनी प्रतिष्ठान तर्फे मध्यरात्री मजुरांसाठी जेवण व फलाहार घेऊन ते स्वतः मुलीका देवी विद्यालयात पोहचले व मजुरांना जेऊ घातले.
            सरकारी पातळीवर मजुरांना कोरडा शिधा व किराणा माल दिला खरा परंतु तो बनवायचा कसा हा मोठा प्रश्न मजुरांपुढे होता त्यांच्या कडे स्वयंपाक करण्यासाठी ना कुठली भांडी होती ना शेगडीची व्यवस्था त्यामुळे त्यांना दुपारच्या उरलेल्या जेवणावच अर्ध्यावर समाधान मानून झोपावे लागले होते.आमदार निलेश लंके यांनी मध्यरात्री का होईना मजुरांच्या पोटात दोन घास दिल्याचे समाधान मात्र त्या मजुरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top