मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.
यावेळी छगन भुजबळ यांनी देखील ट्विटर वरून आपल्या प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
काल अभिनेता इरफान खान यांच्या दुःखद निधनानंतर आज भारतीय चित्रपट सृष्टीवर पुन्हा ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या दुःखद निधनामुळे शोककळा पसरली असून चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का आहे. बालवयात चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेल्या ऋषी कपूर यांनी शेवटपर्यंत आपल्या अभिनयातून चित्रपट रसिकांचीमने जिंकली. चित्रपट सृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान असून ऋषी कपूर यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.दिवंगत हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली!
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद