मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती.ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या होती. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं होतं.
1970 सालच्या 'मेरा नाम जोकर'मध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली 'बॉबी' ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका निभावल्या. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. 90 च्या व 2000 च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला. 'कुछ तो है' या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलरनं खुर्चीला खिळवून ठेवलं. तर 'अग्निपथ(नविन)' मध्ये रौफ लालाची भूमिका चांगलीच गाजली होती.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद