नगर : राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचा अजूनही कापुस खरेदी झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये अडकून पडले आहेत. कापसाची खरेदी होउन तातडीने पैसे मिळाले नाही तर खरीप हंगामावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सरकारने कसल्याही अटी न घालता शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला कापुस तातडीने खरेदी करावा अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे. सरकारकडून याबाबत दुर्लक्ष केल तर लाॅकडाऊन उघडल्यानंतर शेतकरी सह्याची मोहिम राबवून पणनमंत्र्याच्या दारात अंदोलन करणार असल्याचे दहातोंडे यांनी यांनी सांगितले.
राज्यातील नगर, मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागात कापासाचे उत्पादन घेतले जाते. यंदा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे महासंघ व काॅटन काॅप्रोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ने सुरु केलेली कापुस खरेदी केंद्रे सुमारे दिड ते दोन महिने बंद होती. त्यामुळे अजूनही राज्यभरात अजूनही लाखो शेतकाऱ्यांच्या घरात कापुस पडून आहे. पंधरा दिवसापासून कापुस खरेदी केंद्रे सुरु झालेली असली तरी खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना अजूनही कापसाची खरेदी होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत- संभाजी दहातोंडे (शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष )
शेतकऱ्यांच्या घरात आज मितीला सुमारे सात हजार कोटी रुपयांचा कापुस पडून आहे. त्यात खरेदी केंद्रावर कवडी व लेंडीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कापसाची कटती केली जात आहे. अनेक खरेदी केंद्रचालक शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत लुट करत आहेत. दोन महिने कापुस खरेदी केंद्रे बंद असल्याने कापुस विक्रीला उशिर झाला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे असलेला कापुस चांगल्या दर्जाचा असताना कटती करण्याचे कारण नाही. कापुस विक्री होत नसल्याने शेतकरी हा अन्याय निमुटपणे सहन करत आहेत.
खरीपाच्या तोंडावर शेतकरी त्रस्त असल्याने राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांकडील कापुस विनाअट खरेदी करावा व केंद्रावर केली जाणारी कपात थांबवून सरसकट एफएक्यु च्या दरानुसार कापुस खरेदी करावा. याबाबत तातडीने सरकारने दखल घेतली नाही, तर 21 मे नंतर पणनमंत्र्याच्या दारात अंदोलन करणार असल्याचे संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद