श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील निळोबाराय महाराज पालखी सोहळा आषाढी वारी निमित्त पंढरपूर नियोजन बैठक पार

0
जवळा : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील निळोबाराय महाराज पालखी सोहळा आषाढी वारी निमित्त पंढरपूर नियोजन बैठक पार पडली.

चालू वर्षी देशात नव्हे तर राज्यातही कोरोना च्या प्रादुर्भावामुळे जनता त्रस्त झाले असून चालू वर्षाचे पंढरपूर आषाढी वारी बाबत निळोबाराय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत पालखी सोहळा प्रमुख निळोबाराय वंशज गोपाळ काका मका शेर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे निळोबाराय महाराज पालखी सोहळा व पादुका घेऊन जाण्यासाठी दिंडी चालक व भाविकांची बैठक संपन्न झाली.
अशोकराव सावंत यांनी सांगितले की चालू वर्षी कोरो नाचा प्रादुर्भाव असला तरी पंढरपूर येथे येणाऱ्या मानाच्या 9 पालखी सोहळ्यावर प्रमाणे निळोबाराय महाराज  सोहळ्यास ही शासनाने परवानगी द्यावी १५ जून २०२० रोजी  पिंपळनेर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून सकाळी अकरा वाजता प्रस्थान होणार असून पहिला मुक्काम निळोबाराय मंदिरात होणार आहे.
चौकट
ह भ प काशिनाथ दुबे कान्हूर पठार दिंडी चालक व व भगवान महाराज रेपाळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली पंढरपूरची पायी दिंडी सोहळा परंपरा शेकडो वर्षांची असून यापूर्वीही अनेक वेळा अनेक संकटे आले परंतु आजपर्यंत वारी खंडित झाली नाही यापुढेही ती असेच अखंड चालू राहावी याबाबत शासनाने योग्य ती दखल घेऊन चालू वर्षी चे पंढरपूरची वारी सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे असून जगाला संदेश देणारी वारी आहे.
यावेळी निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव पठारे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत पालखी सोहळा प्रमुख निळोबाराय वंशज गोपाळ बुवा मका शेर सचिव चांगदेव शिर्के लक्ष्मण खामकर त्रिंबक आन्ना गाजरे बबन लटांबळे भाऊसाहेब लटांबळे पांडुरंग रासकर विणेकरी विलास दिवटे दत्तात्रेय रसाळ भिकाजी मुळे गोकुळ गाडीलकर तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर अमदाबाद विठ्ठल वाडी व परिसरातील चाळी स दिंडी चालक हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top