पारनेर : तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रांधे येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने रांधे येथे दिंड्यासह हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट विठ्ठलवाडी व सेनापती बापट सेवा मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलवाडी देवस्थान येथे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यावर्षी वाढत्या कोरोना विषानुमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या कारणास्तव विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान दर्शनासाठी बंद असणार आहे. त्यामुळे त्यामुळे भाविकांनी स्वतःची काळजी घ्यावी, घरीच सुरक्षित रहावे आणि सदर सूचनेच पालन करावे आणि देवस्थान कमेटीस सहकार्य करावे असे आवाहन स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट रांधे यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद