ऑनलाईन नृत्य रंगोत्सव राज्यस्तरीय स्पर्धेत निघोजची सानिका अनिल चौधरी महाराष्ट्र राज्यात प्रथम

0
निघोज : अभिरंग बालकला संस्था कल्याण या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन नृत्य रंगोत्सव राज्यस्तरीय स्पर्धेत लहान गटात  पारनेर तालुक्यातील निघोज कु. सानिका अनिल चौधरी हिस महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. पारीतोषिक व सन्मानचिन्ह असे या बक्षिसाचे स्वरूप असुन सानिकाच्या या विजयाचे पारनेर तालुक्यात स्वागत होत आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अभिरंग बालकला संस्था कल्याण ही संस्था दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करते. गेली पंचवीस वर्षे ही स्पर्धा सुरु असुन यंदा प्रथमच राज्यस्तरीय आँनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यातुन शेकडो बालकलाकारांनी सहभाग नोंदवला परीक्षक भरतनाट्यम विराशद सौ. नम्रता जोशी यानी काम पाहीले संस्थेच्या वतीने आज सोशल मीडियावर हा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये लहान गटात सानिका अनिल चौधरी व आलिया काझी यांनी  प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा सांवत यांना द्वितीय तर शांभवी बडवे हिला तृतीय क्रमांक मिळवला. तसेच स्वराली दिवटे, मृणाली कोळंबेकर व नेत्रा कुलकर्णी यांना विशेष पारीतोषिक देण्यात आले.तसेच यावेळी मोठा गट व समुह गटाच्याही स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. लहान गटात सानिका चौधरीने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल पारनेर तालूक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सानिका चौधरी हिला कलाआविष्कार डान्स अँकाडमीचे संचालक कानिफनाथ फुलमाळी व मच्छिंद्र बोदगे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top