महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निघोज येथे कोरोना योध्दा पुरस्कारांचे वितरण

0
निघोज : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने निघोज येथील मळगंगा कुंड  येथे कोरोना योध्दा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी डाॅ.आकाश सोमवंशी, डाॅ.श्रीकांत पठारे, शिवबा संघटना यांना पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकारसंघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे हे होते. यावेळी ग्रामपंचायत निघोज, मळगंगा ग्रामिण विकास ट्रस्ट, भैरवनाथ पतसंस्था, मळगंगा पतसंस्था, निघोज ग्रामिण पतसंस्था, सर्व सेवाभावि संस्था, सर्व संघटनांचे वतीने पत्रकारसंघाच्या नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर निघोज जगप्रसिध्द कुंड पर्यटनस्थळ परीसरात सर्व पत्रकार व ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले. यावेळी निघोजचे सरपंच ठकाराम लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष तथा मळगंगा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकरशेठ कवाद, भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब वरखडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सोमनाथ वरखडे, मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, संचालक कॅप्टन विठ्ठल वराळ, बबन तनपुरे, बबन ससाणे, शेटे, शिवसेना शाखाप्रमुख अमोल गजरे, शिवबा संघटनेचे सचिव लहुशेठ गागरे यांचेसह पत्रकार संघटनेचे मार्गदर्शक अनिल चौधरी, अरुणराव आंधळे पाटील, सदानंद सोनावळे, भगवान श्रीमंदीलकर, ज्ञानेश्वर लोंढे, सतिष रासकर, रामदास नरड, सचिव मनिषा बाबर, उपाध्यक्ष शिरीष शेलार, विनोद गायकवाड, राम तांबे, दत्ता ठुबे, खजिनदार संदिप गाडे, संपर्कप्रमुख संजय मोरे, प्रसिध्दीप्रमुख श्रीनिवास शिंदे, उपसचिव बाबाजी वाघमारे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, निघोज शहराध्यक्ष सागर आतकर, कार्यकारीणी सदस्य सुधिर पठारे, विजय रासकर, चंद्रकांत कदम,आनंदा भुकन, गंगाधर धावडे,संपत वैरागर, किरण थोरात,निलेश शेंडगे जालिंदर सालके आदी पत्रकारां सह ग्रामस्थ उपस्थित होते. यापूर्वी पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने  तिन टप्प्यामधे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. यामधे पारनेर येथे पारनेरचे आमदार निलेश लंके, तहसिलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, आरोग्य सेविका सोनाली गुंडवासुंदे येथे अहमदनगर जि.प.चे मा.उपाध्यक्ष सुजित झावरेपाटील, प्राथ.शिक्षक आनंदा झरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे आणि निघोज येथे डाॅ.आकाश सोमवंशी, पारनेर पंचायत समितीचे सदस्य  डाॅ.श्रीकांत पठारे, शिवबा संघटना आदींना " कोरोना योध्दा " पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.प्रास्ताविक व सुत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी तर आभार सागर आतकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top