माऊली वरखडे यांचा वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून केले निसर्ग संवर्धनासाठी वृक्षरोपण

0
निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील युवा उद्योजक माऊली वरखडे यांच्या वाढदिवस निमित्ताने निघोज येथील लामखडे- वरखडे वस्ती व दत्तमंदिर परिसर तसेच शिवा पाटील पवार मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून कै. दशरथ लामखडे यांच्या कुटुंबास 5000 रु रोख रकमेची आर्थिक मदत करून एक सामाजिक बांधिलकी माऊली वरखडे यांनी जपली. 

याप्रसंगी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे सचिन पाटील वराळ, मंगेश लाळगे, सरपंच शिवा पवार, प्रगतशील शेतकरी जबाजी लामखडे, सुनील लामखडे,सुभाष वरखडे, बाबाजी वरखडे, संदीप वरखडे, गंगा वरखडे, अनिल लामखडे, रवींद्र लामखडे, विलास लामखडे, साजिद तांबोळी, अक्षय वरखडे, संकेत वरखडे,ओंकार वरखडे, प्रतीक लामखडे, सौरभ वरखडे, किरण वरखडे, स्वप्नील वरखडे, ऋषी घोगरे, सोहेल मोमीन व माऊली वरखडे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवृत्ती वरखडे यांनी कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top