मुंबई दि. 8 – मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेअंतर्गत भांडूप येथे दक्षता पथकामार्फत 15 लाख 60 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा मुंबईचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत दिनांक 06 जुलै 2020 रोजी दक्षता पथकाकडून भांडूप विभागात ट्रक क्र.एम.एच.-05-ए.एम.-1633 मधून अवैधरित्या अन्नधान्य वाहतूक प्रकरणी तांदूळ 17500 कि.ग्रॅ., गहू 1800 कि.ग्रॅ. जप्त करण्यात आलेला असून भांडूप पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद क्र.58/2020 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हा नोंद प्रकरणी रुपये 15 लाख 60 हजार 550 रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


.jpg)
.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद