पारनेर : बोगस बाजरी बियाणे दिल्याने उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे "त्या" नामांकित कंपनीवर पारनेर पोलीस स्टेशन मध्ये आज गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पारनेर तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पारनेर तालुक्यातील सुमारे २३० शेतकऱ्यांच्या ४०० हेक्टर वरील बाजरी बियाणे उगवल्या नसल्याच्या तक्रारी पारनेर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आल्या होत्या. त्याअनुषंगाने राहुरी कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी पाहणी करून बियाणे तपासणी केली होती. त्यांचा अहवाल आल्यानंतर आज मंगळवारी (दि.०७) गुन्हा दाखल करण्यात आला. सकापासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अखेर सायंकाळी ४ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला. बाजरी बियाण्याच्या त्या कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे दिल्याने बियाण्यांचे उगवण झाले नाही. ते बियाणे पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवले असून ते निकृष्ट असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सिद्ध होत आहे. त्याप्रकरणी बियाणे कायदा १९६६ व भांदवी १९६६ च्या कलम ४२०, ३४ अन्वये संबंधित कंपनीवर पारनेर तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करत आहेत.

गुन्हा दाखल झाला यात समाधान; शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेपर्यंत पाठपुरावा - गाजरे
बोगस बाजरी बियाणे देऊन शेतकऱ्यांचे नुकसान व फसवणूक केल्या प्रकरणी सबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत पाठपुरावा केल्याचे काही अंशी यश मिळाल्याचे समाधान आहे. परंतु त्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. - शिवसेना उपतालुकाप्रमुख ताराचंद गाजरे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद