❀꧁बरसण्याने तुझ्या पावसा...!꧂❀
बरसण्याने तुझ्या पावसा
भरून येतो उर
रुसलास कधी तर
डोळ्यांत येतो पूर...!
आहेस तू अबोल तरी
बोलून जातोस खुप
पावसा तू बरसतोस नि
धरित्रीला देतोस रूप...!
कधी पडतोस मुसळधार
तर कधी रिपरीप
कधी पडतो संततधार
तर कधी चिडीचीप...!
विहिरी, तळे एव्हढेच काय
कोरडा पडतोय घसाही
म्हणूनच तू बरसत जा
चालेल आम्हा कसाही...!
बरसण्याने तुझ्या पावसा
निसर्ग सुद्धा फुलून जातोय
मातीच्या त्या गंधाने
आम्ही सुद्धा भुलून जातोय...!
पावसा तुझं येणं असतं
नवी उमेद, नवी आस
म्हणूनच तुझी दरवर्षी
वाट पाहतो आम्ही खास...!
©✍📚ओमप्रकाश देंडगे
मु.पो.गांजीभोयरे,ता. पारनेर
जि- अहमदनगर
📞9767788778
**✧═════•❁❀❁•═════✧**
बरसण्याने तुझ्या पावसा
भरून येतो उर
रुसलास कधी तर
डोळ्यांत येतो पूर...!
आहेस तू अबोल तरी
बोलून जातोस खुप
पावसा तू बरसतोस नि
धरित्रीला देतोस रूप...!
कधी पडतोस मुसळधार
तर कधी रिपरीप
कधी पडतो संततधार
तर कधी चिडीचीप...!
विहिरी, तळे एव्हढेच काय
कोरडा पडतोय घसाही
म्हणूनच तू बरसत जा
चालेल आम्हा कसाही...!
बरसण्याने तुझ्या पावसा
निसर्ग सुद्धा फुलून जातोय
मातीच्या त्या गंधाने
आम्ही सुद्धा भुलून जातोय...!
पावसा तुझं येणं असतं
नवी उमेद, नवी आस
म्हणूनच तुझी दरवर्षी
वाट पाहतो आम्ही खास...!
©✍📚ओमप्रकाश देंडगे
मु.पो.गांजीभोयरे,ता. पारनेर
जि- अहमदनगर
📞9767788778
**✧═════•❁❀❁•═════✧**
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद