पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना राज्यसरकारने ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर यांची मागणी

0
पारनेर वृत्त : टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी (दि.2) पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. त्यांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व रायकर यांच्या कुटुंबियांना राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी घोषणा केल्याप्रमाणे ५० लाखांचे विमाकवच अंतर्गत कुटुंबियांना मदत मिळावी, त्याचप्रमाणे पत्रकार संतोष भोसले(बीड), गंगाधर सोमवंशी (लातूर), जयप्रकाश डिगराळे(नंदुरबार) या कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबियांना ५० लाखांची शासनाकडून मदत लवकरात लवकर मिळावी. तसेच प्रत्येक कोविड सेंटर मध्ये पत्रकारांसाठी बेड आरक्षित ठेवावेत.अशी मागणी पारनेर तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच यांच्यावतीने करण्यात आली. निवेदन देण्यासाठी पारनेर तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.



पांडुरंग रायकर हे 42 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.
पांडुरंग रायकर हे अतिशय अभ्यासू पत्रकार होते. पुण्यातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top