🔷🔸माझी शाळा.. माझे शिक्षक🔸🔷 शब्दांकन -✍️ओमप्रकाश देंडगे

1

🔷🔸माझी शाळा.. माझे शिक्षक🔸🔷

⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘*



शब्दांकन -✍️ओमप्रकाश देंडगे 



पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे हे माझं छोटंसं गाव..


लहानपणी आठवतंय गावच्या रस्त्याची दुर्दशा झालेली..दळणवळण सोयी अपुऱ्या.. शाळेला भौतिक सुविधासुद्धा अपुऱ्या  असायच्या..अडचणीच अडचणी होत्या.. पण माझ्या गावातलं शिक्षण हे पुण्या-मुंबईला भेटणार नाही इतकं टॉपचं होतं..अंचलेश्वर विद्यालय हे आम्हा मित्रांसाठी पुणे विद्यापीठच  होतं जणू... माझी शैक्षणिक जडणघडण खऱ्या अर्थानं तिथं झाली..



अंचलेश्वर विद्यालयाला लाभलेले शिक्षक आमच्यासाठी वरदान होते.. आमचे प्रेरणास्थान मुख्याध्यापक श्री. खैरे सर आणि  संपूर्ण शिक्षक स्टाफ आमच्या सर्वांगीण जडणघडणीचे शिल्पकार होते... त्यांनीच दिशा दिली.. त्यानुसार आम्ही चाललो.. आणि आम्ही जिंकलोदेखील..



          They all teachers were  an inspiration to students . They activated a hunger for knowledge and wisdom, inspired us.. Thanks for everything..



 त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना शाळेच्या त्या बंदिस्त भिंतीतून आम्हाला बाहेरचं सुंदर जग दाखवलं,सोनेरी स्वप्नं दिली.. आमच्या उज्ज्वल भविष्याला आकार दिला, हिम्मत दिली, विश्वास दिला, जिंकण्याची उर्मी दिली..आमच्या पंखांना आकाशात उंच भरारी घेण्याचं बळ दिलं..खुप काही सर्वोत्तम देण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांना आठवलं की खुप भरुन येतं मन ..डोळ्यातदेखील आपसूकपणे पाणी साचतं..



त्या सर्व गुरुजनांप्रति  आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने  ऋण व्यक्त करताना लहानपणी ऐकलेल्या कवितेच्या काही ओळी नकळतपणे काळजात घर करतात--



    गुरूने दिला ज्ञानरुपी वसा   आम्ही चालवू हा पुढे वारसा
    पिता बंधू  स्नेही  तुम्ही  माऊली

    तुम्ही  कल्पवृक्षा तली  सावली
   तुम्ही सुर्य  आम्हा  दिला  कवडसा
   आम्ही चालवू हा पुढे वारसा
   शिकू  धीरता  शूरता , वीरता

   धरू  थोर  विद्येसवे  नम्रता
   मनी  ध्यास  हा  एक  लागो  असा
   आम्ही चालवू हा पुढे वारसा
    

   गुरूने दिला ज्ञानरुपी वसा
   आम्ही चालवू हा पुढे वारसा



              ©✍📚 ओमप्रकाश देंडगे
                        मुपो गांजीभोयरे
                  ता. पारनेर, जि. अहमदनगर
                   📞976778877

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top