कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा दया.-शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाचे मागणी.

0
पारनेर: कांदा निर्यात बंदी व मराठा आरक्षण स्थगित त्वरित उठविण्यात यावी. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेउन शेतकऱ्यांना जिवे मारण्याचेच धोरण घेतलेले दिसते आहे.कोरेना काळात देशाला जगवणारा शेतकरी आहे याचा विसर सरकारला पडलेला आहे. या निर्णयाचा देशभर निषेध होत आहे.  त्यामुळे माननीय पंतप्रधान  मोदी साहेबांनी त्वरित निर्यातबंदी हटवावी. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण जोपर्यंत लागु होत नाही तोपर्यंत नोकरभरती त्वरित थांबवावी. व सरकार मराठा आरक्षण लागु व्हावे यासाठी प्रामाणिक असल्याचे सिद्ध करावे अन्यथा मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. या मागणीचे निवेदन तहसिलदार पारनेर त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री उद्घवजी  ठाकरे, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांना देण्यात आले.

यासंदर्भात पारनेर तालुक्यातील सर्व पक्षानी व सामाजिक संघटनानी एकत्र यावे व मराठा आरक्षण व कांदानिर्यात बंदिला तीव्र विरोध करावा व त्यासाठी एकत्रित नियोजन करून आंदोलन करावे असे अवाहन शिवबा संघटना अध्यक्ष/प्रहार प्रतिनिधी अनिल शेटे यांनी केले.

यासंदर्भात झालेल्या चर्चेत अनिल शेटे, उमेश सोनवणे, राजु लाळगे, रमेश वरखडे, विठ्ठल कवाद, रोहिदास लामखडे, नवशाद पठाण, सागर गोगाडे, शांताराम पाडळे, सचिन कोतकर, दत्ता टोनगे, कुमार महाराज नाणेकर, शंकर वरखडे, गागरे योगेश्वर, गणेश लंके, दीपक मावळे, देवराज शेंडकर, किरण शिंदे, जयराम सरडे, गणेश चौधरी, खंडु लामखडे, स्वप्नील लामखडे, अंकुश वरखडे, मच्छिंद्र लाळगे, निलेश दरेकर, नवनाथ बरशिले, शिखर घुले, निलेश वरखडे, रोहन वरखडे, आदेश गुंजाळ, सागर वैद्य, मिनिनाथ कवाद, शरद चेडे, दादाभाउ रसाळ, शरद वरखडे व राजेंद्र वाळुंज आदिनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top