कोरोना रोगाचा प्रार्दूभाव वाढत चालला असुन रक्ताची कमतरता लक्षात घेऊन वडनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
निघोज प्रतिनिधी (संदीप गाडे) - पारनेर तालुक्यातील वडनेर बु.येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सर्वत्र कोरोना रोगाचा प्रार्दूभाव वाढत चालला असुन रक्ताची कमतरता भासत असते. त्यामुळे वडनेर बु . स्पोर्ट्स क्लब"या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वडनेर याठिकाणी 'भव्य रक्तदान शिबीर'आयोजित करण्यात आले. कोरोना महामारीच्या सद्यपरिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना राष्ट्र कार्याचे भान ठेऊन 'वडनेर बु. स्पोर्ट्स क्लब' व पुना सिरोलाँजिकल इन्सिट्युट ब्लड बँक,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. 

या शिबिरात सौ.शुभांगीताई सुनिल चौधरी यांनी सुद्धा राष्ट्र कार्यास हातभार लावत रक्तदान केले. त्यांच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमास 'आमदार निलेशजी लंके  प्रतिष्ठानचे युवक तालुका अध्यक्ष मा.विजुभाऊ औटी व त्यांचे सहकारी, शिवबा संघटनेचे अध्यक्ष मा.अनिलजी शेटे, पं.स.सदस्य मा.दिनेश दादा बाबर, वडनेर बु!!स्पोर्ट्स क्लब चे संस्थापक अध्यक्ष मा.सोमनाथ वायदंडे, विशेष सल्लागार मा.राम वायदंडे, उपाध्यक्ष मा.विठ्ठल बाबर, सरपंच रेखाताई येवले, ग्रा.पं.सदस्य सुनिल बाबर, राहुल बाबर, मा.अनिल नर्हे, रमेश येवले, रामदास वायदंडे, पृथ्वीराज खुपटे, शिवा पवार, गणेश शेटे व ग्रामस्थ आणि स्पोर्ट्स क्लब चे सर्व पदाधिकारी, खेळाडू व रक्तदाते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या शिबिरामध्ये सर्वांनी मास्क व सॅनेटायझरचा वापर करून नियमांचे पालन करत शिबीर शिस्तबद्ध रित्या संपन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top