खासदार डॉ.सुजय विखेंच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून अळकुटी ते राळेगण थेरपाळ रस्त्यासाठी १६ कोटी रु. मंजूर :- सुजित झावरे पाटील

0
पारनेर :- पारनेर तालुक्यातील अळकुटी-देवीभोयरे-निघोज(NH) या रस्त्यासाठी १६ कोटी इतकी रक्कमेस मंजुरी मिळाली असून यासाठी नगर दक्षिण लोकसभेचे खासदार मा. श्री. सुजय विखे पाटील यांचेकडे सुजित झावरे पाटील यांनी ग्रामस्थासमवेत सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करणेसाठी मागणी केली होती. सुजित झावरे यांच्या मागणीची दखल घेत खासदार मा. सुजय विखे यांनी केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करून आग्रहाची मागणी केली होती. त्यानुसार सदर रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास योजने अंतर्गत १६,३६,०८,८०८/इतका निधी मंजूर करण्यात आला. 

पारनेर तालुक्यातील अळकुटी, लोणीमावळा, वडझिरे, देवीभोयरे, वडगाव गुंड, निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ इ गावासाठी सर्वात मोठा ३९ किलोमीटरचा रस्ता मंजूर झाल्याने यासर्व गावातील ग्रामस्थानी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.

या रस्त्यावरून ऊस, दूध, भाजीपाला इ मालाची आवक जावक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे रस्त्याच्या मंजुरीने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मात्र भेटला आहे.
उर्वरित राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी फाटा रस्ताच्या मागणीसाठी पुढील आठवड्यात खा. सुजय विखे पाटील यांच्यासोबत दिल्ली येथे जाऊन केंद्रीयमंत्री यांची भेट घेऊन सदर रस्तासाठी निधी मंजूर करणेबाबत मागणी करणार आहोत - सुजित झावरे पाटील


यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भाजपा पारनेर तालुका माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा भाजपा निमंत्रित सदस्य विश्वनाथ कोरडे, माजी बाजार समिती सभापती बापू भापकर,संदीप पाटील युवा मंचचे सचिन वराळ पाटील, रवींद्र पाडळकर, सरपंच पंकज कारखीले, उपसरपंच योगेश आढाव, उमेश सोनवणे, निलेश घोडे, अमोल रासकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top