निघोज -पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांनी शिरुर येथे संसदरत्न खा.डॉ.अमोलजी कोल्हे यांना अनेक वर्ष प्रलंबित असणा-या वडनेर बु.(पारनेर जि.अ.नगर)आणी वडनेर खुर्द(शिरुर जि.पुणे)या गावांना जोडणारा कुकडी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे यासंदर्भात निवेदन दिले.यावेळी शिरुरचे मा.आ.पोपटराव गावडे,पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक सचिन भालेकर, भारतीय युवा कॉग्रेस महाराष्ट्र राज्य प्रवक्ते रणजित बाबर यावेळी उपस्थित होते.
खा.डॉ.सुजयदादा विखे आणी शिरुरचे खासदार डॉ.अमोलजी कोल्हे साहेब यांच्या संयुक्त प्रयत्नाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेत या मार्गाचा समावेश करुन कुकडी नदीवरील पुलाचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार - दिनेशदादा बाबर (पारनेर पंचायत समिती सदस्य )
यावेळी बोलताना संसदरत्न खा.डॉ.अमोलजी कोल्हे म्हणाले की दोन्ही वडनेर ही गावे नगर - पुणे जिल्हांच्या सरहद्दीवर असुन दोन्ही गावामधुन कुकडी नदी वाहते.कुकडी नदीवर पुल बांधण्यापुर्वी शिरुर तालुक्यातील वडनेर खुर्द - टाकळी हाजी - मलठण - शिक्रापुर मार्ग आणी पारनेर तालुक्यातील वडनेर बु - निघोज - पिंप्रीजलसेन - पारनेर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग(इ.जि.मा.)असल्यामुळे हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. या मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा द्यावा लागेल आणी वडनेर खुर्द ते ब्राम्हणठिका हा मार्ग त्या समाविष्ठ करुन हा मार्ग पंतप्रंधान ग्रामसडक योजनेत बसवुन सदर कुकडी नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्यासाठी अहमदनगरचे खा.डॉ.सुजयदादा विखे यांचीही मदत लागणार आहे. त्यासाठी खा.डॉ.सुजयदादा विखे व मी संयुक्त प्रयत्न करुन हा प्रश्न आम्ही मार्गी लावु असे संसदरत्न खा.डॉ.अमोलजी कोल्हे म्हणाले.
यावेळी मा.आ.पोपटराव गावडे म्हणाले की कुकडी नदीवर पुल व्हावा ही दोन्ही गावांची अनेक वर्षांची मागणी असुन कुकडी नदीवर पुल झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील वडनेर, शिरापुर या गावासह 10 ते 15 गावामधील ग्रामस्थांना पुणे शहराचे अंतर 25 कि.मी ने कमी होणार असुन शेतमाल वाहतुक व विद्यार्थी वर्गास या पुलाचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद