पारनेर तालुक्यातील जवळा परिसरातील गव्हाळी येथे अपघात झाल्याने दोघे गंभीर जखमी.

0

पारनेर:  तालुक्यातील जवळा परिसरातील गव्हाळी येथे अपघात झाल्याने दोघे गंभीर जखमी.



सध्या ऊस तोडणी सुरू आहे. काही शेतात ट्रॅक्टर ट्रॉली जात नसल्याने ट्रॉली ही मुख्य रस्त्याच्या कडेला लावण्यात येऊन ऊस भरला जातो. वाहन चालकांना रात्रीच्या वेळी समोरील उसवाहतुक करणारे वाहन न दिसल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. 

वाहतुक वाहनाला रिफ्लेक्टर गरजेचा असताना त्याची अंमलबजावणी करताना कोणी दिसत नाही.  त्याचा परिणाम म्हणजे गव्हाळी परिसरात गंभीर अपघात.

रात्रीच्या वेळी ऊस वाहतुक वाहनांला रेडीएम रिफ्लेक्टर नसल्यामुळे पाठीमागुन धडकल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी शिरूर येथे पाठविले आहे.

यावेळी लोकजागृती सामाजिक संस्था यांचे तर्फे ऊस वाहतुक वाहनांना रेडीयमचे रिफ्लेक्टर बसवण्याची सक्ती करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत प्रशासनास पत्रव्यवहार करणार असल्याचे लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top