पारनेर : शेतकर्यांचा शेतरस्त्याचा व पाण्याचा संघर्ष संपवण्यासाठी पारनेर तालुक्यातील शेतरस्ते व पाणी टंचाईग्रस्त पिडीत शेतकर्यांनी एकत्र येत शिव पाणंद शेतरस्ते निर्माण व पाणीदार महाराष्ट्र कृती समितीच्या माध्यमातुन जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते शेतरस्ते संघर्षमुक्ती व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती अभियानाच्या पत्रकाचे अनावरण केल्यानंतर बहीरेपणाचे सोंग करणार्या सरकारला, प्रशासणाला जागे करण्यासाठी "आवाज दो" आंदोलनाचा लढा व्यापक करण्यासाठी शिव पाणंद व पाणीदार महाराष्ट्राची चळवळ गावागावात पोहचायला सुरुवात झाली असुन, पारनेर तालुक्यातील शेतरस्ते पिडीत व पाणी टंचाईग्रस्त भागातील वाघुंडे, सुलतानपुर, सुपे, वाळवणे, हंगे(साठेवस्ती), सारोळा आडवाई आदी गावांना भेटी देत शेतकर्यांच्या समस्या समजुन घेत "आवाज दो" आंदोलनाची रुपरेषा सांगत शेतरस्त्यांची दयनीय अवस्थेची पाहणी करत शेतकर्यांची एकजुट करत शेतकर्यांशी संवाद साधला जात असताना सारोळा आडवाई येथील असणारा बंधारा मुबलक पाऊस होवुनही भरलेला बंधारा गळतीमुळे तळाला पोहचला असुन भविष्यात पाण्याची समस्या परिसरात निर्माण होईल अशा प्रकारचे बंधारे, पाझर, तलाव यांना राळेगणसिद्धीचा प्लॅस्टीक पेपर अस्तरणीकरणाचा प्रयोग राबवण्यासाठी झोपेचे सोंग करणार्या प्रशासणाला जागे करण्यासाठी जनजागृती अभियानाचे पत्रक चळवळीचे प्रणेते शरद पवळे, संजय कनिच्छे यांनी गावोगावी पोहचवले असुन सर्वत्र या अभियानाचे स्वागत होत असुन लवकरच तालुका पिंजुन काढुन राज्यात "आवाज दो " आंदोलन पोहचवण्यासाठी पुढची दिशा लवकरच ठरवली जाईल असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वर्तमान पत्राशी बोलताना सांगितले.
चौकट - "आवाज दो" आंदोलन शेतकरी हितासाठी असुन यामुळे भावबंदकीचा वाद संपेल शेतकर्यांना कोर्टाची पायरी झिजवावी लागणार नाही. उभ्या जगाचा पोशिंदा आपल्यासाठी कोरोनामध्ये(लाॅकडाउनमध्येही)जीवाची पर्वा नकरता आपल्यासाठी उभा होता त्याला न्याय देण्यासाठी या लढ्याला सर्वांनी बळकट करणे ही आपली नैतीक जबाबदारी समजावी -शरद पवळे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद