पारनेर:(प्रतिनिधी : चंद्रकांत कदम) तालुक्यातील वडझिरे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वडझिरे शाखेत सोमवारी दुपारी बराच वेळ सर्व्हर डाऊन झाल्यामुळे खातेदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या बँकेत नेहमीच सर्व्हर डाऊन होत असून ग्राहकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याच्या तक्रारी खातेदारांकडून होत आहेत.
वडझिरे हे गाव आर्थिक उलढालीच्या दृष्टीने सक्षम गाव आहे. शेजारील ५,६ गावांमिळून एक राष्ट्रीयकृत बँक असल्याने वडझिरे येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या शाखेत खातेदारांची नेहमी गर्दी असते. रविवारची सुट्टी असल्याने सोमवारी खातेदारांनी आर्थिक देवाणघेवाणीसाठी बँकेत मोठी गर्दी केली होती. त्यात सुमारे १२ वाजण्याच्या आसपास सर्व्हर डाऊन झाल्याने व्यवहार ठप्प झाले. व खातेदारांची मोठी रांग बँकेत ताटकळत उभी राहिले. बँकेच्या या शाखेत नेहमी सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांमधून होत असून तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी खातेदारांकडून केली जात आहे.
सोशल डिस्टनसिंग चा फज्जा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. परंतु सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेत सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडालेला दिसून येत आहे. बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देखील सोशल डिस्टनसिंग बाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद