पारनेर: तालुक्यातील निघोज येथील श्री.मुलीकादेवी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कु.श्रद्धा सत्यवान ढवण या विद्यार्थिनीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत साठ म्हशीचा सांभाळ करून ती कुटुंबाला हातभार लावत आहे. केंद्रशासन, राज्यशासन, पुणे विद्यापीठ व आत्मनिर्भर भारत या योजनेने श्रद्धाच्या कामगिरीची दखल घेतली. याबद्दल महाविद्यालयात श्रद्धाच्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.
या प्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.नंदकुमार झावरे यांनी श्रद्धाचे अभिनंदन केले व तिला शुभेच्छा दिल्या. आत्मनिर्भर श्रद्धाची वाटचाल ही प्रेरणादायी असून ती देशपातळीवरील व राज्यपातळीवरील मुलीसाठी दिशादर्शक आहे. निघोज येथे महाविद्यालय स्थापनेचा उद्देश गुणवंत व कीर्तीवंत विद्यार्थ्यांच्या रूपाने आज देश पातळीवर समोर आला आहे. ग्रामीण भागात जिद्दी व कष्टाळू विद्यार्थी असतात. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद