शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने केलेल्या आहवानाला निघोजकरानी १००% पाठिंबा

0

पारनेर: तालुक्यातील निघोज येथील शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष व ग्रामस्थांच्या वतीने केलेल्या आहवानाला निघोजकरानी १००% पाठिंबा दिला. त्याबद्दल अनिल शेटे यानी निघोजकराचे आभार मानले.



दिल्लीतील शेतकऱ्यांच्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून भारत बंद चे अहवान करण्यात आले होते. १०-१२ दिवसापासून आंदोलन सुरु आहे. मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे. म्हणून शेतकरी संघटनानी बंद पुकारला होता व देशभरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. त्याला पाठिंबा म्हणून शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बंदबाबत निघोज सह पारनेर तालुक्यातील सहकार्याना बंद मध्ये सहभागी होण्याचे जाहीर अहवान केले होते.

निघोज गावातील व्यापारी व शेतकरी बांधवानी सकाळपासून संपूर्ण व्यवहार १००% बंद ठेउन बंदला सहकार्य केले. त्यावेळी पोलिस बांधवांचे सहकार्य लाभले. यावेळी मागण्यांचे  निवेदन देण्यात आले. उत्पादन खर्चावर ५०% नफा पकडून हमीभाव दयावा हि मागणी करून पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. निवेदन पोलिस अधिकारी विजयकुमार बोर्त्रे यानी स्विकारले. निवेदन नामदार बच्चूभाऊ कडु,आमदार निलेशजी लंके, पारनेर तहसिल, यानाही देण्यात आली.

यावेळी शिवबा प्रमुख व नामदर बच्चू कडु समर्थक मा.अनिल शेटे, सरपंच ठकाराम लंके, सचिन पाटील वराळ, कार्याध्यक्ष ज्ञानदेव लंके, राजुभाउ लाळगे, रमेश वरखडे, रोहिदास लामखडे, शंकर वरखडे, शिवाजी वराळ, बाबाजी लामखडे, अमोल ठुबे, विश्वास शेटे, भगवानमामा लामखडे, शांताराम कळसकर,दत्ता कवाद, संकेत लाळगे, विकास लामखडे, स्वप्नील वरखडे आदि उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top