जवळे येथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी साजरी

0

पारनेर : तालुक्यातील जवळे येथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य वारकरी संप्रदायात १४ टाळकरी यापैकी एक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे त्यांची ओळख असून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कट्टर शिष्य असल्याने संताजी महाराज जगनाडे तुकाराम महाराजांचे जिथे कीर्तन प्रवचन होत त्याची नोंद ठेवत होते या नोंदी मुळेच आज तुकारामाची गाथा पहावयास मिळत आहे व जिवंत आहे असे प्रतिपादन पारनेर तालुका तिळवण तेली समाज उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी पारनेर तालुक्यातील जवळे येथील श्री धर्मनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन करताना केले
पारनेर तालुक्यातील जवळे येथील तेली समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब किसन शेलार यांच्या हस्ते राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मदन रत्नपारखी बाळासाहेब शेजुळ, मधुकर लोखंडे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज उपाध्यक्ष शिरीष शेलार, महेश शेलार, राजेंद्र रत्नपारखी व समाज बांधव तसेच विद्यालयातील प्राचार्य यशवंत वाबळे, पर्यवेक्षक शाहूराव औटी, सांस्कृतिक कला विभाग प्रमुख समीर काळे, संतोष जाधव, राजेंद्र खोसे, संदीप पवार, विलास पावडे, अभिजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top