पारनेर तालुका राष्ट्रीय वारकरी परीषद मेळावा आज पिंपळनेरला संपन्न झाला .

0

पारनेर : तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या प्रांगणात डॉ. ह.भ.प विकासानंदजी मिसाळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका राष्ट्रीय वारकरी परिषद मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प मारूती महाराज (शास्त्री ) तुणतुणे (अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परीषद महाराष्ट्र राज्य) हे होते.

यावेळी तालुका अध्यक्षपदी ह.भ.प. माऊली महाराज खामकर पिंपळनेर तर उपाध्यक्षपदी ह.भ.प. बाबा महाराज भांड यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अशोकराव सावंत, ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे, ह.भ.प. बापु हार्दे, ह.भ.प. चांगदेव महाराज शेळके, सौ.रोहणी ताई राऊत( अध्यक्ष मराठा महासंघ महा. राज्य), पांडुरंग रासकर व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सुत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले तर आभार माऊली महाराज खामकर यांनी मानले. मेळाव्यासाठी माऊली खामकर, गणपत शिंदे, बाबाजी वाकळे, दत्तात्रय रसाळ, हनुमंत रसाळ यांनी आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top