निघोज येथे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण

0

निघोज:- पारनेर तालुक्यातील निघोज येथे पोलिओ लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. परिसरातील मातांनी आपल्या बालकास पोलिओ डोस देण्यासाठी सकाळीच हजेरी लावली होती. हे पोलिओ लसीकरण निघोज येथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत सुरू होते. निघोज येथील कन्हैया दूध उद्योग समूहाचे शांताराम मामा लंके यांच्या हस्ते बालकास पोलिओ डोस देऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करत पोलिओ लसीकरण सुरू होते. यावेळी डॉ.व्यवहारे,गायकवाड एन एन,अर्चना, द्वारका राऊत, सोनल राऊत, सोनाली लामखडे, उषा राऊत, प्रमिला चौधरी, उषा आतकर इत्यादी आशा लसीकरण मोहिमेत कार्यरत होत्या.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top