पिंपळनेरकर सामाजिक मंचाकडुन फिल्टर व सतरंजी भेट तर निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर यांनी ५० जेवणाची ताटे व ग्लास भेट

0

पारनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथे पिंपळनेरकर सामाजिक मंचाकडुन फिल्टर व सतरंजी भेट तसेच निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर यांनी ५० जेवणाची ताटे व ग्लास भेट दिली. सध्या जगभरात कोरोनामुळे लोक त्रासलेली होती. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढतच चालली असताना एक सामाजिक बांधिलकी जपत पिंपळनेरकर सामाजिक मंचाने संत निळोबाराय वारकरी शिक्षण संस्था पिंपळनेर यांना पाण्याचा फिल्टर व मकाशीरबुवांनी ५० जेवणाची ताटे, ग्लास भेट दिली. एक समाजसेवेचे कार्य हाती घेतल्याने अनेक विद्यार्थ्याना घडविण्याचे कार्य निळोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प.गणेश म शेंडे करत आहेत.

उद्घाटनप्रसंगी निळोबारायांचे वंशज गोपाळबुवा मकाशीर, सामाजिक मंचाचे अध्यक्ष मच्छिंद्र गाजरे, उपाध्यक्ष बापुसो लटांबळे, खजिनदार संजय सालके,सचिव तुळशीराम कळसकर सर आदी प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. 

सुत्रसंचालन गहिनीनाथ लोंढे यांनी केले.  ह.भ.प. गणेश महाराज शेंडे यांनी आभार मानले. व पारनेर तालुक्यातील पालकांना आपल्या मुलामुलींना वारकरी शिक्षण घेण्यासाठी आव्हान केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top