पारनेर: तालुक्यातील गोरेगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे हळदी कुंकू समारंभ व गोरेगावची होम मिनिस्टर 2021 हा महिला भगिनींसाठी विशेष स्पर्धांचा आणि मोठं मोठी बक्षीसे असणारा एक भव्य कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली वर्षभर सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होत असल्याने महिलांनी या कार्यक्रमासाठी तुडुंब गर्दी केली होती. कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांना ग्रामपंचायत मॉडेल गोरेगावच्या वतीने एक स्टेनलेस स्टील चा एक टिफिन वाण म्हणून देण्यात आला.सोबत नाश्ता देण्यात आला. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप तांबे व सचिव विकास काकडे यांच्या संकल्पनेतुन सर्व महिला भगिनींना एक हजार निंबोनीच्या रोपांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले.एक जिवंत आणि अविस्मरणीय वाण मिळाल्याची भावना महिला भगिनींनी यावेळी व्यक्त केली.
प्रथम क्रमांक मिळवून ज्यांनी मनाची पैठणी जिंकली त्या "सौ.नंदा योगेश नांगरे या ठरल्या गोरेगावची 2021 च्या होम मिनिस्टर"
द्वितीय क्रमांक सौ.सुशीला जबाजी तांबे यांनी मिळवला त्यांना आभूषण ज्वेलर्स यांच्या कडून सोन्याची नथ तसेच पेटल टच ब्युटी पार्लर कडून रुपये तीन हजार किंमतीचे एक मेकअप किट देण्यात आले.तृतीय क्रमांक सौ.वैशाली संतोष नरसाळे यांना मिक्सर,चतुर्थ क्रमांक सौ. शैला संतोष नरसाळे यांना प्रेशर कुकर,पाचवा क्रमांक सौ. रोहिणी शेळके यांना टेबल फॅन,सहावा क्रमांक सौ.नविना शेलार यांना सिलिंग फॅन,सातवा क्रमांक सौ.स्वाती नांगरे यांना इस्त्री अशी नामांकित कंपनी च्या वस्तूंची भेट मिळाली.तर आकर्षक उखाणा घेऊन सात महिलांनी एक विशेष भेट वस्तू बक्षीस म्हणून मिळवली.
या कार्यक्रमात गोरेगावचे सुपुत्र श्री.अभय नामदेव पवार यांनी स्वतः गायलेले आणि संगीतबद्ध केलेले तसेच त्यांच्या कन्या कु. स्वराली पवार व कु.सांची पवार यांनी कोरस दिलेले तसेच नुकतेच अल्ट्रा म्युझिक कंपनीने हक्क विकत घेतलेले "हिला म्हणत्यात गो,,म्हणत्यात डिस्को वाली " या गाण्याचे प्रमोशन आपल्या जन्मभूमीत मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.सुमन बाबासाहेब तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सर्व उपस्थितांनी या गाण्यावर ठेका धरला. पवार कुटुंबाचा गावच्या वतीने या प्रसंगी सन्मान करण्यात आला.
महिलांना एकच दिवस मिळतो आपलं आयुष्य पुन्हा जगण्याचा, कधीतरी जीवनातील बालपण पुन्हा अनुभवण्याचा हे व्यासपीठ महिलांना सन्मान देते मनातल्या भावना सर्वांसमोर खुल्या करण्याचा, बिनधास्त बोलण्यासाठी व हीच एक संधी असते, महिला भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची. त्यामुळे मी आहे तोपर्यंत गोरेगावची होमनिस्टर आहे, अशी भावना सरपंच सौ.तांबे यांनी व्यक्त केली. सुप्रसिद्ध निवेदक उद्धव काळा पहाड यांनी आणि त्यांच्या टीम ने होम होमनिस्टर कार्यक्रमाचे निवेदन केले. या कार्यक्रमसाठी कु.मृणाल तांबे व कु.शेजल नरसाळे या युवतींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सरपंच सौ.सुमन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री.संदीप तांबे यांच्या संकल्पनेतून हा आगळा वेगळा असा भव्य कार्यक्रम पार पडला.
गावातील शेकडो महिलांसोबतच पुरुषांनी ही हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भूमिकेतून पहिला. हजारो लोकांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हा कार्यक्रम घर बसल्या पाहिला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मा.सभापती श्री.बाबासाहेब तांबे, मा.सरपंच श्री.राजाराम नरसाळे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, उपसरपंच श्री.दादाभाऊ नरसाळे, ग्रा.पं.सदस्य श्री.आण्णा पाटील नरसाळे, श्री.साहेबराव नरसाळे, सौ.स्मिता काकडे, श्री.संपत नरसाळे, श्री.वामन चौरे मेजर, श्री.अनिल पाटील नरसाळे, श्री.सोमनाथ तांबे, आभूषण ज्वेलर्स, पेटल टच ब्युटी पार्लर, दिशा फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद