शेतकर्यांचा पिढ्यानपिढ्या चाललेला शेततरस्त्यांचा संघर्ष संपवण्यासाठी व तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील बळीराजासाठी संघर्ष करतच राहणार असुन पाण्याप्रमाणे शेतकर्यांचा शेतरस्त्यांचा मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार असुन एक ना एक शिव पाणंद शेतरस्ता खुला करुन त्याचे दर्जेदार काम करुन घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. - शरद पवळे
पारनेर : नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनातुन महसुल विभागात विजय सप्तपदी अभियान राबवले जात असुन या अभियानात शिवपाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावरही काम चालु केले असुन त्याचा मोठा फायदा शेतकर्यांना होणार आहे. ३१ मार्चपर्यंत हे अभियान सुरु असुन शिवपाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी हे अत्यंत महत्वपुर्ण पाऊल असुन हे राज्याला दिशादर्शक असुन पारनेर तालुक्यात शिवपाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शेतरस्ते पिडीत शेतकर्यांनी गेल्या काही वर्षांपासुन या विषयाला पारनेर तालुक्यात विविध आंदोलनांच्या माध्यमातुन एक राज्यासमोर समाजहीताची मोठी चळवळ उभारुन शेतकर्यांनी एकत्र येत राज्यव्यापी आंदोलनाचे स्वरुप देत गावागावात ही चळवळ पोहचत आहे त्यातच पारनेर तहसिलवर महसुल सुरु झालेल्या विजय सप्तपदी अभियानात शेतकर्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी शिवपाणंंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीने पारनेर तहसिलसमोर शिवपाणंद शेतरस्तेपिडीत शेतकर्यांना मंगळवार दि.१६ फेब्रु.२०२१ रोजी सकाळी ११.०० ते २.०० यावेळेत शेतरस्त्यांसंदर्भात अर्ज, निवेदने, प्रतिज्ञापत्र आदी प्रश्नावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यातले असुन पारनेर तालुक्यातील शेतकर्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपला शेतरस्त्यांचा संघर्ष संपवावा असे मत शिवपाणंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीचे शरद पवळे, संजय कनिच्छे, रघुनाथ कुलकर्णी, भास्कर शिंदे, विठ्ठल शेळके, अशोक आबुज, सुर्यकांत सालके, राजेंद्र वाळुंज, भरत जाधव, पांडुरंग कळमकर, राजेंद्र कारखिले, गोरक्ष कवाद, दिनेश झांबरे आदिंनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद