पारनेर:( प्रतिनिधी- निलेश जाधव) तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतची सरपंच पदी सौ.अरुणा प्रदीप खिलारी तर उपसरपंचपदी श्री. सुनिल हरिभाऊ चव्हाण यांची वर्णी यामध्ये आ.निलेश लंके व ज्येष्ठ नेते सीताराम खिलारी यांच्या ग्रामविकास मंडळाने १० जागा जिंकल्या असतानाही चार सदस्यांनी बंडखोरी करून विरोधी पॅनलचे 5 उमेदवार यांना बरोबर घेऊन टाकळीढोकेश्वर गावात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे यामध्ये आमदार निलेश लंके यांचे निकटवर्ती बाळासाहेब खिलारी यांच्या सुविद्य पत्नी अरुणा प्रदीप खिलारी यांची सरपंच पदी वर्णी लागली असून उपसरपंचपदी सुनील हरिभाऊ चव्हाण यांची वर्णी लागली आहे. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत 15 सदस्यां पैकी अरुणा प्रदीप खिलारी यांना 9 मते मिळाली असून त्यांच्या विरोधी असलेल्या पूजा नवीन झावरे यांना 6 मते मिळाली.
तर उपसरपंच निवडीमध्ये सुनील हरिभाऊ चव्हाण यांना 9 मते मिळाली तर किशोर शिवाजी गायकवाड यांना 6 मते मिळाली. मा.आ. औटी व अशोकशेठ कटारिया यांच्या मंडळास ५ जागांवर विजय मिळाला, पण निवडणूक निकालानंतर आ. लंके प्रणीत सदस्यांनी सीताराम खिलारी यांच्या गटाबरोबर असलेल्या सदस्यांशी कोणतीही चर्चा न करता थेट विरोधी गटाशी संपर्क साधून आ.लंके समर्थक चार व विरोधी पाच सदस्यांना एकत्रित सहलीसाठी पाठविले होते. आज हे ९ सदस्य बरोबर वेळेवर आल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली.
तरी सरपंच व उपसरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता होती . त्यातूनच सरपंच पदासाठी चुरस निर्माण झाली होती. त्यातूनच सरपंचपदी आपल्या गटाकडे राहावे यासाठी हि युती झाल्याचे कळते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद