पारनेर: तालुक्यातील निघोज येथे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीमध्ये संदीप पाटील वराळ जनसेवा पॅनलने बाजी मारली असून सरपंचपदी चित्राताई सचिन वराळ, उपसरपंच पदी ज्ञानेश्वर उर्फ माउली वरखडे यांची नऊ मतांनी विजयी झाले आहेत. वराळ विरोधी गटाचे सात तर वराळ गटाचे आठ सदस्य यावेळी उपस्थित होते.सरपंचपदासाठी वराळ गटाकडून चित्राताई सचिन वराळ पाटील उपसरपंच पदासाठी ज्ञानेश्वर उर्फ माउली विठ्ठलराव वरखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी सुधामतीताई कवाद,अविता शंकर वरखडे तर उपसरपंचपदासाठी शंकर गबाजी गुंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.यामध्ये अविता वरखडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सरळ लढती मध्ये सौ चित्रा वराळ यांना नऊ मते तर व माऊली वरखडे यांनाही नऊ अशाप्रकारे दोन्ही उमेदवार विजयी झाले . यावेळी वराळ गटाचे चित्राताई सचिन वराळ पाटील,सचिन पाटील वराळ, मंगेश वराळ, ज्ञानेश्वर उर्फ माउली वरखडे, शबनूर इनामदार, मिराबाई घोगरे, जयाताई वराळ, रुपाली गायखे हे आठ सदस्य तर विरोधी गटाकडून सुधामती कवाद,अविता वरखडे,भावना साळवे,ज्योती पांढरकर, योगेश वाव्हळ,भरत रसाळ, शंकर गुंड आदी सात सदस्य उपस्थित होते. तर या निवडणुकीचे निवडनूक निर्णय अधिकारी म्हणून संभाजी झावरे यांनी काम पहिले, तर पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी बंदोबस्ताचे काम पहिले.
निघोज सरपंच उपसरपंच निवडणुकीत चित्राताई सचिन वराळ पाटील व ज्ञानेश्वर उर्फ माउली वरखडे यांचा नउ मतांनी विजयी
फेब्रुवारी ०९, २०२१
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद