बससेवा त्वरित सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन करू - अनिल शेटे (शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती)

0

पारनेर- तालुक्यातील निघोज व परीसरातील शेकडो विदयार्थी शिक्षणाच्या निमित्ताने व नागरिक रोज पारनेर याठिकाणी दैनंदिन कामकाजा निमित्ताने ये - जा करत असतात. कोरोना काळात बससेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता कॉलेज महाविदयालय सुरु झाली आहे. मात्र बससेवा बंद असल्याने विदयार्थी व नागरीकाना येण्याजाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विदयार्थी नी मागणी करुनही बससेवा सुरु केली नाही. यासदर्भात विद्यार्थ्यांनी शिवबा कार्यालयात तक्रार केली. निवेदनात बस सुरु न केल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात त्वरित बससेवा सुरु करावी यासाठी शिवबा संघटना व प्रहारच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती राज्यमंत्री नामदार बच्चू कडु, मा. निलेश लंके आमदार, मा.विजयराव औटी माजी उपाध्यक्ष विधानसभा, मा.प्रशांत गायकवाड सभापती बाजार समिती, संचालक जिल्हा बॅंक, मा.सुजित पाटील झावरे, मा.पुष्पाताई वराळ सदस्य जिल्हा परीषद, मा. डॉ भास्कर शिरोळे, पारनेर तहसील, पोलिस निरीक्षक देण्यात आल्या. निवेदनावर शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, रमेश वरखडे, शंकर गुंड ग्रा.सदस्य, राजुभाउ लाळगे, विठ्ठल कवाद, भरत रसाळ ग्रा.सदस्य खंडु लामखडे, अनिल लामखडे, गणेश लंके, साई ढवण, नवनाथ लामखडे, शंकर वरखडे, विश्वास शेटे, राहुल शेटे, मच्छिंद्रनाथ लाळगे, अक्षय गायकवाड, संदेश घोगरे, शांताराम लामखडे, एकनाथ शेटे, पोपट वरखडे, अंकुश वरखडे, स्वप्नील लामखडे, निलेश वरखडे, रोहन वरखडे व विदयार्थीच्या शेकडो सह्या असणारे निवेदन देण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top