इंधन दरवाढी बद्दल जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी घेणार आक्रमक भूमिका.

0

पारनेर/प्रतिनिधी (गणेश जगदाळे):  देशातील जनता कोरोना मुळे आधिच त्रस्त आहेत तशातच केंद्र सरकारने गँस,पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली अशा परिस्थितीत सर्व सामान्य माणसांचे जगणे मुश्कील केले असे असताना केंद्र सरकारने दुसरा धक्का देत देशातल्या रासायनिक खतांची किंमत ४०% टक्कयांनी वाढवली  कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची ४०% टक्के दरवाढ करून  केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात होत असलेली अन्यायकारक इंधन दरवाढ ही कमी करावी असे मत अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी व्यक्त केले आहे. इंधन आणि गॅसची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीचा राज्यातील राष्ट्रवादी युवती व महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.  

२०१४ पूर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते. परंतु, तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे. 

केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे.- राष्ट्रवादी युवती अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top