पिंपरी जलसेनकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

0
पिंपरी जलसेन | News महाराष्ट्र दर्शन |प्रतिनिधी : चंद्रकांत कदम
पारनेर:  तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे महिनाभरापासून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाण्याची गंभीर समस्या भासू लागली होती. सध्या कुकडी कालव्याचे पाणी लिफ्ट योजनेद्वारे ग्रामपंचायत मार्फत गावात आल्याने पिंपरी जलसेनमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मार्च महिन्यानंतर पिंपरी जलसेन येथे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न नेहमी उद्भवत असतो. कुकडी कालव्याला पाणी आल्यानंतर रोकडेश्वर उपसा जलसिंचन योजनेद्वारे कुकडी कालव्याचे पाणी पिंपरी जलसेनला लाभ होत असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही.  फेब्रुवारी महिन्यात कालव्याला आवर्तन आले होते त्यावेळी पिंपरी जलसेन येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व इतर मान्यवरांनी लिफ्ट योजनेद्वारे गावात पाणी आणल्याने नागरिकांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. परंतु कुकडीचे आवर्तन लांबल्याने मे महिन्यापासून पुन्हा पाण्याची टंचाई भासू लागली होती. गेल्या आठवड्यात कुकडी कालव्याला आवर्तन सुटल्याने आता पुन्हा या लिफ्ट योजनेद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. कुकडी कालव्याचे पाणी रोकडेश्वर उपसा जलसिंचन योजनेद्वारे पिंपरी जळसेनमध्ये आल्याने गावातील सर्व नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून सर्व नागरिकांना घरोघरी नळाद्वारे पाणी मिळणार असल्याचे मत पिंपरी जलसेन ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व लिफ्ट योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केली.
               पिंपरी जलसेन मधील सर्व शेतकऱ्यांना पिण्याचे व शेतीचे मुबलक पाणी उपलब्ध होऊन सर्व शेतकरी सधन व्हावेत यासाठी महानगर बँकेचे अध्यक्ष कै. सॉ. गुलाबराव शेळके यांच्या संकल्पनेतून निघोज परिसरातून कुकडी कालव्यावरून पाणी पिंपरी जळसेनमध्ये आणण्यासाठी रोकडेश्वर उपसा जलसिंचन योजना गेल्या ३५-४० वर्षांपूर्वी साकारली होती.  गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना बंद होती त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना या योजनेचा लाभ होत नव्हता. पिंपरी जलसेनचे सुपुत्र व सध्या मुंबई येथे गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस विभागात पोलीस निरीक्षक पदावर काम करत असणारे अनिल वाढवणे यांच्या मोलाच्या सहभागातून ही योजना उर्जितावस्थेत आली. त्यामुळे सध्या या योजनेचे पाणी पिंपरी जलसेनकारांना मिळत आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व गावतील जेष्ठ नागरिकांनी या योजनेद्वारे कुकडी कालव्याचे पाणी गावात आणून ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला असल्याने नागरिकांमधून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ही योजना सुरू करण्यासाठी राबणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले जात आहे.
कुकडी कालव्याचे पाणी  लिफ्ट योजनेद्वारे  पिंपरी जलसेन येथे सोडताना सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ (छाया - चंद्रकांत कदम)


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top