पारनेर : तालुक्यात निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व भूगोल विभागाच्या वतीने एकदिवसीय सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेप्रसंगी पुणे येथील फार्मलॅब कंपनीचे प्रसिद्ध तज्ञ व्याख्याते डॉ. संतोष चव्हाण यांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेचा विषय शाश्वत शेत पीक उत्पादनातील सूक्ष्मजीव व जैविक आर्क यांचे महत्व व शेतबांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना हा होता.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
पहा नेमके काय म्हणाले मनसे पदाधिकारी
https://www.facebook.com/sagaratkar97/videos/169245815147296/
आजच्या परिस्थितीत शेती पद्धतीत नव नवीन प्रयोग होत असून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक घटकाचा व कीटकनाशकाचा अमर्याद वापर होत असून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी जीवनावर व शेतीवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेती महत्त्वाची असून ती काळाची गरज आहे. यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अवशेषमुक्त शेती करावी - डॉ. चव्हाण
डॉ. चव्हाण पुढे म्हणाले की, सेंद्रिय शेतीसाठी शेतीतील पिकांच्या वाढीसाठी बाहेरून काहीही विकत घेऊन टाकावे लागत नाही तर पिकांच्या वाढीसाठी लागणारे सर्व घटक शेतातच नैसर्गिकरित्या उपलब्ध करावयाचे असतात. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र, कारखान्यातील मळी, राख, अश्या साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते असे त्यांनी सांगितले.तसेच बांधावरील सेंद्रिय शेतीचे फायदे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळे प्रसंगी शुभेच्छा संदेशात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व सांगून संपूर्ण जगभरात आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्ये, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती, इत्यादीची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन, पृथ्वीतलावरील प्राणी व जीवसृष्टी संवर्धन, जमिनीचे स्वास्थ्य, शेतमाल विषमुक्त फळे व भाजीपाला, मानवाचे आरोग्य इत्यादी घटकांवर सेंद्रिय शेती हाच एकमेव घटक आहे म्हणून सेंद्रिय शेती क्षेत्रात मोठा वाव आहे असे डॉ. आहेर यांनी सांगितले.
या कार्यशाळेसाठी निघोज येथील प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ, तसेच अनेक शेतकरी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी सत्तर विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ. मनोहर एरंडे यांनी तर आभार प्रा. पोपट सुंबरे यांनी मांडले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद