कोरोनामुळे मागच्या वर्षांपासून आपण सगळेच घरात अडकून आहोत, जरा थोडी कुठे मोकळीक मिळाली की लगेच निर्बंध लागले जातात. सध्यातरी बर्याचशा गोष्टी घरातच बसून होत असल्याने आधी आपली होणारी कामासाठीची धावपळ नक्कीच थांबली आहे.
यामध्ये मुलांच्या ऑनलाइन शाळा, नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे आता या सगळ्याची आपल्या सर्वांनाच सवय बनून गेली आहे. मध्यंतरी कडक निर्बंधांमुळे घराच्या बाहेर पडणे देखील मुश्कीलच बनले होते. घरातील वयोवृद्ध लोकांच्या आरोग्याच्या समस्या देखील वाढत चालल्या आहेत.
अशातच तरुणांच्या जिव्हाळ्याची शरीरयष्टी कामावण्याचे ठिकाणही कोरोनाने बंद करण्यास भाग पाडले होते, आता सध्या काही प्रमाणात जीम सुरू झाल्यात परंतु काही ठिकाणी मात्र निर्बंध अजून लागू आहेत. त्यामुळे अनेक जीम व्यावसायिक चितेत आहेत.
लोकांनी या नवीन सवयींना सुद्धा स्वीकारले आहे, त्यामुळे जसे काम घरातून करत आहेत. त्याप्रमाणे आता स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील ते घेत आहेत. घरातल्या घरात योग करणे, घराच्या आसपास सायकलिंग करणे इत्यादी व्यायाम करताना दिसून येतात.
लहानपणापसून आपण एक व्यायाम प्रकार नेहमी ऐकत आलो. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही नेहमी सांगत असतात. १२ आसनांचा सूर्यनमस्कार.
१२ आसनांचा असलेला सूर्यनमस्कार हा व्यायाम आपल्या शरीराला आणि मनाला आपल्या श्वासाला एकत्र आणतो. चला तर मग जाणून घेऊयात सूर्यनमस्कराचे फायद्याबद्दल...
(महत्वाची सूचना : सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्याच्या स्थितीवरून आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा व्यायामप्रकार करावा )
सूर्यनमस्कार या शब्दातच सूर्य असल्याने तसेच आपल्या दिवसाची सुरवात करणारा देखील सूर्य असतो. त्यामुळे सूर्यप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही संधी असते.सूर्यनमस्कार सकाळी घालावेत, कारण दिवसाची सुरवात उत्तम होते आणि मन सुद्धा प्रसन्न होते. शरीराला लवचिक बनवते तसेच रक्ताभिसरण सुधारते, शरीरातील इतर महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. ज्यांना अगदीच सकाळी शक्य नसते त्यांनी संध्याकाळी घालायला हरकत नाही.
सूर्यनमस्कार लाभदायी कसे ?
आपल्या संपूर्ण शरीर अंगाची हालचाल होत व्यायाम होतो. रोज सूर्यनमस्कार घातल्याने कफ, वात, पित्त यांच्यात समतोल साधला जातो. आपले पोट, मज्जसंस्था, यांचे कार्य सुधारते.
सूर्यनमस्कार कुठे घालाल ?
प्रत्येक गोष्टीची एक जागा, वेळ ठरलेली असते. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार देखील स्वच्छ, सकाळच्या कोवळ्या किरणांमध्ये घालवेत. सूर्यनमस्कार योगा मॅटवरच शक्यतो करावेत. सूर्यनमस्कार घालताना शक्यतो सैल कपडे घालावेत. शरीराला संपूर्णपणे ताण देणारा हा व्यायाम आहे. सूर्यनमस्कार घालताना चेहरा नेहमी प्रसन्न ठेवावा.
सूर्यनमस्काराचे मानसिक फायदे :
आजचे युग हे स्पर्धेचे व धक्काधक्कीचे युग मानले जाते. स्पर्धा म्हटलं, की हरणे आणि जिंकणे आले, जिंकल्यावर जसा आनंद होतो तसा हरल्यावर आपण जास्त दुःखी होतो. सतत दुःख कुरवाळत बसलो तर आपण कधीच प्रगती करू शकत नाही.
सूर्यनमस्कार घातल्याने जसे शरीरातील अवयवांचे कार्य सुधारते तसेच मनाचेही कार्य सुधारते.
आपल्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुलांकडून देखील सूर्यनमस्कार घालून घेतले पाहिजेत, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांना टिकून राहण्यासाठी शरीर देखील तंदुरुस्त असायला हवं म्हणूनच त्यांनी रोज सूर्यनमस्कार घालावेत. एखाद्या मुलाला जर खेळाडू बनायचे असेल तर त्यासाठी हा उत्तम व्यायामाचा प्रकार आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद