मुलिकादेवी महाविद्यालय विद्यार्थी घडवणारे केंद्र - थोरात

0

पारनेर: तालुक्यात निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे आयोजित एकदिवस वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे प्रसंगी मुंबई येथील सहाय्यक राज्यविक्री आयुक्त मा. स्वाती थोरात यांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. या ऑनलाईन वेबिनारचा विषय 'स्पर्धा परीक्षाद्वारे करिअर आणि त्याचे स्वरुप' हा होता.

करियरच्या नवनव्या टप्प्यांवर द्याव्या लागणाऱ्या परीक्षांना सामोरे जाताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा व कुठल्याही परीक्षेची तयारी करताना त्या परीक्षेचे नेमके स्वरूप, आराखडा कसा असतो हे लक्षात घेणे उचित ठरते.- स्वाती थोरात

स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन नियोजन करून व सकारात्मक विचार करून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग अधिक प्रशस्त करता येतो. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत स्पर्धा परीक्षेमुळे संघर्ष करण्याची चिकाटी तयार होते व हीच चिकाटी, मेहनत आणि जिद्द, ठरवलेले ध्येय गाठून देते असे मार्गदर्शन थोरात यांनी या वेबिनारद्वारे  केले.

आजचे स्पर्धेचे जग आहे. आयुष्य ही जणू स्पर्धा आहे.त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जाताना जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे गुण असणे आवश्यक आहे असे सांगितले.- प्राचार्य डॉ. सहदेव आहेर

निघोज सारख्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतील यशातून चांगल्या पदावर काम करत आहेत.

मुलिकादेवी महाविद्यालय नेहमीच स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे विद्यार्थ्यासाठी अशा विविध व्याख्यानातून संधी उपलब्ध करून देत असते असे सांगून या वेबिनारसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेसाठी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जिल्ह्यातील, तालुक्यातील व परिसरातील  अभ्यासक विद्यार्थ्या तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी दोनशे नवद व्यक्तीनी या वेबिनार मध्ये सहभाग नोंदविला.

या ऑनलाईन वेबिनारसाठी महाविद्यालयांतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. आनंद पाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. मनोहर एरंडे यांनी मांडले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top