पारनेर: शिर्डी साई संस्थांनच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची वर्णी लागणार म्हणून पारनेरकरांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.
पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना महामारीच्या काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून चांगले काम केल्याने व परदेशातही आमदार लंकेची जोरदार चर्चा झाल्याने साई संस्थानच्या अध्यक्षपदी लंकेची वर्णी लागणार म्हणून पारनेरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शिर्डी येथील साई संस्थानच्या विश्वस्त नेमणूक दोन आठवड्यात करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाकडे दिल्या आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. यावेळी अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून पारनेर - नगरचे आमदार निलेश लंके व कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
साई संस्थानच्या अध्यक्ष पदासाठी आमदार रोहित पवार व आमदार निलेश लंके यांच्या नावाची चर्चा सुरू असून हे दोन्ही चेहरे नवीन असल्याने त्यांच्या कामांची दखल घेतली जाणार का ? दोघांपैकी कोणाला संधी दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
साई संस्थानवर राजकीय व्यक्तींच्याच नियुक्त्या असल्याबाबत भाविकांनी सात-आठ वर्षांपूर्वी खंडपीठाकडे दाखल केलेल्या याचिकेनंतर तत्कालीन सरकारला ते विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची वेळ आली होती. आताही न्यायालयाच्या आदेशानंतर राजकीय व्यक्तिऐवजी सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची विश्वस्त म्हणून नेमण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे करत काही नावे सुचवली आहे.
त्यामुळे सध्याच्या सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी दावेदारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून राजकीय चेहर्यांना संधी देण्यात येणार की बिगर राजकीय चेहर्यांच्या व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जाणार याबाबत उत्सुकता आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद