आमदार निलेश लंके यांचा मतदार संघातील विकास कामांचा धडाका सुरू

0
पारनेर : कोरोना संसर्गाचा धोका आता थोडासा कमी झाल्याने आता आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदार संघातील विकासकामाना प्राधान्य दिले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी ५ कोटी १५ लाख रुपये इतक्या खर्चाच्या विकासकामांना मंजूरी दिल्याची माहिती निलेश लंके यांनी दिली आहे. 

पारनेर तालुक्यातील निघोज येथे युपीएससी व एमपीएससी करणार्‍या विद्यार्थ्याच्या अभ्यासिकेसाठी एक कोटीचा निधी मंजूर केला असून अभ्यासिकेची इमारत निघोज येथील पोलिस दूरक्षेत्राजवळ उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असून अनेक अडीअडचणीचा सामना करत आपले शिक्षण पूर्ण करत असतात. अशा होतकरू विद्यार्थ्यांना या परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे लक्षात आल्याने आमदार निलेश लंके यांनी तालुक्यात परिपूर्ण अभ्यासिकेसाठी पाठपुरावा केला होता. या कामास यश आले असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top