संजय गांधी निराधार योजनेच्या पारनेर तालुका समितीच्या अध्यक्षपदी ठकाराम लंके यांची निवड

0

पारनेर : संजय गांधी निराधार योजनेच्या पारनेर तालुका समितीच्या सदस्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून समितीच्या अध्यक्षपदी निघोजचे माजी सरपंच ठकाराम बाळाजी लंके यांची निवड करण्यात आली. आमदार निलेश लंके यांच्या शिफारशीनुसार व उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशान्वये ही निवड करण्यात आली आहे.

कोरोनामुळे अनेक समित्यांच्या निवडी रखडलेल्या होत्या. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर या निवडी करण्यात आल्या असून पारनेर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या अशासकीय सदस्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यामध्ये आमदार निलेश लंके यांचे खंदे समर्थक निघोज गावचे माजी सरपंच ठकाराम बाळाजी लंके यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामध्ये विकास तुकाराम साळवे (चिंचोली), शालिनी अशोक घुले (पिंपळगाव रोठा), नामदेव प्रभू घुले (राळेगण थेरपाळ), संदीप संभाजी रोहोकले (भाळवणी), श्रीकांत किसन चौरे (पारनेर), सचिन गुलाब पठारे (वाळवणे), संचिन रंगनाथ रोहोकले (भाळवणी), आप्पासाहेब गंगाधर शिंदे (पळशी) अशी अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशान्वये या निवडी करण्यात आल्या आहेत. निवडीनंतर अध्यक्ष व सदस्यांचे पारनेर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top