पाथर्डी: येथील गोरे मंगलकार्यालयात सतीश मासाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, गरजूंना किराणा वाटप व कोरोना योद्ध्यांचा सन्मान या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व भाजपचे तालुकाउपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी आमदार निलेश लंके बोलताना म्हणाले, माझी ग्रामपंचायत सदस्य होण्याची देखील परिस्थिति नसतानाही प्रस्थापितांच्या विरोधात मी आमदार होतोय हे एवढेच पुष्कळ आहे. लोकांनी स्वतः लोकवर्गणी जमा करून माला निवडून आणले. आता कोरोना काळात माझ्या जनतेवर कठीण परिस्थिति निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांचे ऋण फेडण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे मी कोविड सेंटरमध्ये अहोरात्र काम करत आहे. तुम्ही सुद्धा लोकांसाठी असे काम करा की पुढचे वीस पंचवीस वर्षे तरी लोक नाव घेतील.
पुढे बोलताना आमदार निलेश लंके बोलताना म्हणाले की, शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात आत्तापर्यंत ८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. याच कारण म्हणजे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात रुग्णाना मिळणारा मानसिक आधार व सकारात्मक विचार यामुळेच रुग्ण ठणठणीत बरे झाल्याचे संगितले.
पाथर्डी तालुक्याची भूमी ही पवित्र असून माझे माहेर घरच आहे. माला आमदार करण्यात पाथर्डीकरांचा मोठा वाटा आहे. येथील येणारा प्रतेक माणूस हा प्रेमाचा आहे. या तालुक्याने मल भरभरून प्रेम दिले ते मी कधी विसरणार नाही.असे आमदार निलेश लंके म्हणाले.
याकार्यक्रमासाठी वसंत कुसळकर,भगवान मासाळकर,संजय मोहिते,विशाल अतकरे, काळू मासाळकर, वैभव पवार आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल राठोड यांनी केले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद