निघोज लॉकडाउन विरोधात बैठा सत्याग्रह करून आंदोलन करण्याचा इशारा | निघोज व्यापारी असोसिएशन आक्रमक

0

पारनेर / प्रतिनिधी : तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयुक्त गमे यांनी भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हुर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव, रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांसह सर्व गावातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच तीन ऑक्टोबरपर्यंत ही १२ गावे बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढला असून कोरोना समितीस विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या निर्णयावर निघोज व्यापारी असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त केला असून गाव बंद न ठेवणे बाबत मंडल अधिकारी शेकटकर यांना निवेदन देण्यात आले आहे. निघोज व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असा शासकीय आकडा आहे. मात्र ही आकडेवारी चूकीची आहे. गेली दोन वर्षांपासून सातत्याने लॉकडाउन असल्याने व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी सध्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असली तरी महसूल प्रशासनाने मात्र निघोज व परिसरातील गावे लॉकडाउन केली आहेत. निघोज येथे कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने दाखवण्यात आली आहे. आसपासच्या गावातील रुग्ण निघोज मधील यादीत दाखविण्यात आल्याने निघोज मधील संख्या कमी असूनही दुप्पट झाली आहे. प्रत्यक्षात निघोज आणि परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. शासकीय आकडे चुकीचे आहेत. 

प्रत्यक्षात लोकांना कोरोना उपचार हॉस्पिटलमध्ये परवडत नाही, यासाठी कोव्हिड सेंटरची खऱ्या अर्थाने गरज आहे. सर्वसामान्य माणूस पैसा आणणार कोठून याचाही शासकीय पातळीवर विचार झाला पाहिजे. ही सर्व उपाययोजना सरकारने करण्याची गरज आहे, मात्र लॉकडाउनच्या नावाखाली शासकीय अधिकारी जनतेला वेठीस धरत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.  

गेली दोन वर्षांपासून लॉकडाउनमुळे सर्वसामान्य जनता तसेच व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गावातील व्यावसायिक हा फक्त व्यवसायावर अवलंबून आहे. त्यास इतर उत्पन्नाचा स्रोत नाही दुकान सुरू असले तरी तो व्यावसायिक शासकीय नियम पाळत आपला व्यवसाय करत आहे व स्वतची काळजी घेत असताना शासकीय नियम पाळण्यासाठी इतरांना प्रवृत्त करत आहे. त्यामुळे निघोज व परिसरातील लॉकडाउन शिथिल करण्यासाठी महसूल, पोलिस व आरोग्य विभागाने सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी या निवेदनाची प्रत मंडल अधिकारी शेकटकर यांना देण्यात आली असून लवकरच तहसीलदार, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांनाही निवेदन देण्यात येणार असून निवेदनाचा विचार न झाल्यास निघोज व्यापारी असोसिएशन बैठा सत्याग्रह करुन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मोहन खराडे, सुनिल खराडबा, बाळासाहेब खोसे, नवनाथ ढवण, मोहन श्रीमंदिलकर, संकेत लाळगे, विजय गांधी, महेंद्र शेटे, सत्यवान भूकन, अतुल वरखडे, मंगेश वराळ, मोहन कवाद, ललित गांधी, संजय भंडारी, व्यापारी असोसिएशन सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल प्रशासनाला निवेदन । बैठा सत्याग्रह करून आंदोलन करण्याचा दिला इशारा निवेदन देताना निघोज व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य


हे ही वाचा: पारनेर मधील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा..अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top