घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल. यंदा नवरात्राचा कालावधी आठच दिवसांचा असून, नवरात्रातील देवी पूजनात काही गोष्टी वा घटक महत्त्वाच्या मानल्या जातात. या कोणत्या गोष्टी वा घटक आहे, त्याचे महत्त्व काय? जाणून घेऊया...
दुर्गा देवीच्या आगमनाची सर्वांनाच ओढ लागलेली आहे. वर्षभरात सुमारे चार नवरात्र साजरी केली जातात, असे म्हटले जाते. पैकी दोन नवरात्र गुप्त नवरात्र असतात. अश्विन महिन्यात येणारे शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. शारदीय नवरात्रात भगवती देवीचे पूजन, उपासना, नामस्मरण, आराधना प्रामुख्याने केली जाते. भारतीय संस्कृतीत या शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे. गुरुवार, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी असून, या दिवशी घटस्थापना करून नवरात्रारंभ होईल. यंदा नवरात्राचा कालावधी आठच दिवसांचा असून, नवरात्रातील देवी पूजनात काही गोष्टी वा घटक महत्त्वाच्या मानल्या जातात. या कोणत्या गोष्टी वा घटक आहे, त्याचे महत्त्व काय? जाणून घेऊया...
![]() |
मळगंगा देवीचे मनमोहक रूप |
घटस्थापना करतांना लागणारा महत्वाचा घटक
नवरात्राची सुरुवात घटस्थापना करून केली जाते. यासाठी लागणारे घट हे मातीपासून तयार करण्यात आलेले असतात. जव पेरणीसाठी माती आवश्यक असते. त्यानंतर जव मातीतून आकार घेतात. कलशात मातीचा समावेश केल्यानंतर जव टाकले जातात. सुरुवातीला मातीचा एक थर केला जातो. त्यावर जव ठेवले जातात आणि त्यानंतर त्यावर पुन्हा एक मातीचा थर केला जातो. अशा प्रकारे कलशातील रचना केल्यास घरात धन, धान्य यांची कमतरता राहत नाही. अन्नपूर्णा देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
सात प्रकारचे धान्य
घटस्थापना करताना सात प्रकारच्या धान्याची आवश्यकता असते. याला सप्तधान्य असेही म्हटले जाते. या सप्तधान्यात जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश केला जातो. याशिवाय नवरात्रातील पूजेत विड्याच्या पानालाही महत्त्व असते. कलशात ठेवण्याची विड्याच्या पानांचा वापर केला जातो. तेव्हाच कलशाची म्हणजचे घटस्थापना पूर्णत्वास जाते, असे म्हटले जाते. यामुळे घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते आणि शुभफलप्राप्ती होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
अखंड ज्योत
शास्त्रांनुसार, नवरात्रीच्या पूजनात अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व आहे. अखंड दीप प्रज्वलन म्हणजे एकदा घटस्थापनेच्या दिवशी दीप प्रज्वलित केला की, नवरात्राची सांगता होईपर्यंत तो दीप अखंडपणे तेवत राहणे अत्यावश्यक असते. एखाद्या व्यक्तींने संकल्प करून संपूर्ण नवरात्र अखंड दीप प्रज्वलित ठेवला, तर देवी सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवीच्या आशीर्वादामुळे जीवन सदैव प्रकाशमान राहते. सर्व समस्यांतून मुक्तीचा मार्ग आपोआप दिसू लागतो, असे म्हटले जाते.
लाल रंगाला महत्व
नवरात्रीत देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थानापन्न करताना ती चौरंगावर करावी. तसेच यावरील वस्त्र हे शक्यतो लाल रंगाचे असावे, असे सांगितले जाते. त्यावर कलश आणि देवीची मूर्ती विराजित करावी. देवीच्या पूजनात लाल रंगाच्या फुलांचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जाते. देवीला लाल फुले अर्पण केल्याने धन, धान्य, सुख, समृद्धीचा शुभाशिर्वाद देवीकडून प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. लाल रंग शक्तीचे प्रतीक मानले जाते.
नवरात्रातील सहाव्या दिवशी म्हणजचे अश्विन शुद्ध षष्ठीला कात्यायणी देवीची आराधना केली जाते. या दिवशी बेलाचे पान अभिमंत्रित केले जाते आणि नेत्र स्वरुप देवीला अर्पण केले जाते. यानंतर देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो. कात्यायणी देवीला मध अतिप्रिय असल्याची मान्यता आहे. कात्यायणी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केल्याने समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा, कीर्ती वृद्धिंगत होतो. तसेच एकमेकांप्रती असलेले सौहार्द वाढीस लागते, असे सांगितले जाते.
नवरात्री मधील प्रत्येक दिवसाचे महत्व खालील प्रमाणे मानले जाते.
१} पहिला दिवस-: आश्विन शुद्ध प्रतिपदा,
गुरुवार दिनांक-: ०७/१०/२०२१.
देवीचे शक्तीरुप-: श्री. महाकाली...
देवीचे नवदुर्गा रुप-: श्री. शैलपुत्री...
साडीचा रंग-: पिवळा...
नैवेद्य-: गाईचे शुद्ध साजूक तूप...
पहिल्या दिवशी, श्री. देवीला साजूक तूप अर्पण केल्याने, आपणास बरे होण्याचे आशिर्वाद मिळतात. आणि शरीर निरोगी राहते...
२} दुसरा दिवस-: आश्विन शुद्ध द्वितीया, शुक्रवार दिनांक-: ०८/१०/२०२१.
श्री. देवीचे शक्तीरुप-: श्री. महाकाली...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: श्री. ब्रम्हचारीणी...
साडीचा रंग-: हिरवा...
नैवेद्य-: पंचामृत किंवा साखर...
दुसऱ्या दिवशी, पंचामृत किंवा साखर देवीला अर्पण केल्याने, आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे वय वाढते...
३} तिसरा दिवस-: आश्विन शुद्ध तृतीया, चतुर्थी, शनिवार दिनांक-: ०९/१०/२०२१.
श्री. देवीचे शक्तीरुप-: श्री. महाकाली...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: श्री. चंद्रघंटा...
साडीचा रंग-: करडा/राखाडी...
नैवेद्य-: दूध किंवा खीर...
तिसऱ्या दिवशी, देवीला दूध किंवा खीर अर्पण केल्याने, दु:खापासून मुक्तता होते. आणि परम आनंद प्राप्त होतो...
४} चौथा दिवस-: आश्विन शुद्ध पंचमी, रविवार दिनांक-: १०/१०/२०२१.
ललिता पंचमी...
श्री. देवीचे शक्ती रुप-: श्री. महालक्ष्मी...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: श्री. कुष्मांडा...
साडीचा रंग-: नारंगी...
नैवेद्य-: मालपुआ...
चौथ्या दिवशी, देवीला मालपुआ अर्पण केल्याने, बुद्धीमतेचा विकास होतो. आणि निर्णय घेण्याची शक्तीही वाढते...
५} पाचवा दिवस-: आश्विन शुद्ध षष्ठी, सोमवार दिनांक-: ११/१०/२०२१.
श्री देवीचे शक्ती रूप-: श्री. महालक्ष्मी...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: श्री. स्कंदमाता...
साडीचा रंग-: पांढरा /सफेद...
नैवेद्य-: केळी...
पाचव्या दिवशी श्री. देवीला केळी अर्पण केल्याने, शरीर निरोगी राहते...
६} सहावा दिवस-: आश्विन शुद्ध सप्तमी, शनिवार दिनांक-: १२/१०/२०२१.
श्री. देवीचे शक्तीरुप-: श्री. महालक्ष्मी...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: श्री. कात्यायनी...
साडीचा रंग-: लाल...
नैवेद्य-: मध...
सहाव्या दिवशी श्री. देवीला मध अर्पण केल्याने, आकर्षक शक्ती वाढते...
७} सातवा दिवस-: आश्विन शुद्ध अष्टमी, बुधवार दिनांक-: १३/१०/२०२१.
श्री. देवीचे शक्तीरुप-: श्री. महासरस्वती...
श्री. देवीचे नवदुर्गा रुप-: श्री. कालरात्री...
साडीचा रंग-: गहन निळा...
नैवेद्य-: गुळ...
सातव्या दिवशी श्री. देवीला गुळ अर्पण केल्याने, शोक दूर होतो. आणि येणाऱ्या संकटांपासूनही संरक्षण होते...
८} आठवा दिवस-: आश्विन शुद्ध नवमी, गुरुवार दिनांक-: १४/१०/२०२१.
श्री. देवीचे शक्तीरुप-: श्री. महासरस्वती...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: श्री. महागौरी...
साडीचा रंग-: गुलाबी...
नैवेद्य-: नारळ...
आठव्या दिवशी, श्री. देवीला नारळ अर्पण केल्याने, मुलांशी संबंधित अडचणी दूर होतील. आणि हा नारळ नवरात्र उत्थापन केल्यानंतर वाढवून त्याचा प्रसाद वाटप करावा...
९} नववा दिवस-: आश्विन शुद्ध दशमी, शुक्रवार दिनांक-: १५/१०/२०२१.
श्री. देवीचे शक्तीरुप-: श्री. महासरस्वती...
श्री. देवीचे नवदुर्गा रूप-: सिध्दीदात्री...
साडीचा रंग-: जांभळा...
नैवेद्य-: पांढरे तीळ...
नवव्या दिवशी, श्री. देवीला पांढरे तीळ अर्पण केल्याने, मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळेल. आणि अनुचित घटनांपासूनही संरक्षण मिळेल...
तसेच नवव्या दिवशी आश्विन शुद्ध दशमी, शुक्रवार दिनांक-: १५/१० /२०२१.
विजयादशमी (दसरा.) हा दिवस आल्याने या दिवशी नैवेद्य-: श्रीखंड, पुरणपोळी, पंचपक्वानांसह भोजन...
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद