पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायत येथे शिक्षक दिनानिमित्ताने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. भावी काळात सुदृढ व सक्षम समाज निर्माण व्हावा यासाठी आपले सर्वस्व अर्पण करून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच वर सर्व सदस्यांनी सत्कार केला. वेळप्रसंगी पदरमोड करून शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारात पोहचवणाऱ्या सर्व शिक्षकांविषयी कृतज्ञता सरपंच सुभाष गाजरे पाटील यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे शाळा बंद असून शिक्षण चालू ठेवणाऱ्या व विद्यार्थी दैवत मानून विद्यादानाचे काम विद्यमान तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यादानाचे काम करत धडपडणाऱ्या सर्व शिक्षकांचा यापूढील काळात ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी सन्मान करण्यात येईल.- सरपंच सुभाष गाजरे
यावेळी सेवा निवृत्त शिक्षक खामकर L B सर, वामनराव हजारे, तुळशीराम कळसकर सर याचा प्रथम सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संत निळोबाराय विद्यालय, वस्ती शाळा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच सुभाष गाजरे पाटील, उपसरपंच अमोल पोटे, सदस्य बाळासाहेब गाडे, देवेंद्र लटांबळे, विपुल सावंत, सुनील कळसकर, भाऊसाहेब खामकर, मा.सरपंच भाऊसाहेब लटांबळे, लक्ष्मण खामकर सर, वामन हजारे सर, तुळशीराम कळसकर सर, मुख्याध्यापक भालेराव सर, व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री वीरेंद्र पवार सर, मापारी सर, बढे सर, शिंगाडे सर, ठुबे सर, कळसकर सर, संजय सातपुते, भालेराव सर , खामकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सदस्य देवेंद्र लटांबळे यांनी केले तर स्वागत सरपंच सुभाष गाजरे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदक श्री रामराव पवार सर यांनी केले.





.jpg)
.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद