पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील निघोज येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दरवर्षी नाभिक बांधव श्री. संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या जल्लोषात साजरी करत असतात, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी पुण्यतिथी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी श्री.संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.सचिन वराळ पाटील, उपसरपंच श्री.माऊली वरखडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अस्लम इनामदार, नाभिक समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री.धोंडीबा राऊत, श्री.मनोहर राऊत, श्री.नवनाथ राऊत, श्री.प्रविण राऊत, श्री.राजेश राऊत, श्री.शांताराम राऊत, श्री.सागर आतकर, श्री.संदिप जाधव, श्री.सागर राऊत, श्री.सोपान राऊत, श्री.सुनिल राऊत, श्री.शैलेश राऊत, श्री.नाना राऊत, पोपट राऊत, श्री.सुलतान सय्यद, श्री.सोनवणे, कु.स्वप्निल आतकर आदी नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोहर राऊत यांनी सूत्रसंचालन केले तर कु.स्वप्निल आतकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद