श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात कोरोना लसीकरण मोहिमेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

0

निघोज/प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात कोव्हीड-१९ (corona) (co-vaccine) लसीकरण संपन्न झाले. 

कोव्हीड-१९ या संकटामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे चांगले आरोग्य ही प्राथमिक व महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे त्यामुळे संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोना या संकटाला न घाबरता सर्वानी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.- प्राचार्य डॉ. सहदेव आहेर




महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ, आरोग्य समिती आणि ग्रामीण रुग्णालयात पारनेर व निघोज यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. या मोहिमेस महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी कोव्हीड-१९ बाबतची आर. टी.  पि. सी. आर. चाचणी करण्यात आली. या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर व डॉ. मनोहर एरंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्राचार्य डॉ.आहेर बोलत होते.

या लसीकरण मोहिमेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, आरोग्य अधिकारी डॉ. खटके, डॉ. रोहिणी डोने, डॉ. प्रविण नरसाळे,आरोग्य सेविका शेख रईसा, आशा स्वयंसेविका शीला उचाळे, पारनेर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की, कोव्हीड-१९ बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या साह्याने विद्यापीठ अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेले नियम पाळणे आणि स्वतः बरोबरच सर्वांची काळजी घेणे गरजेचे आहे तसेच मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, वेळोवेळी हात धुणे या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे व ही सर्वांची जबाबदारी आहे असे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top