Crime: आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी जवळेत रास्ता रोको आंदोलन

0

जवळे/प्रतिनिधी (शिरीष शेलार): पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्ती येथे राहणारे पूजा गणेश रोकडे (वय १६) तिच्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार करून खून केल्याची घटना बुधवारी २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. 

सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व झालेल्या घटनेतील आरोपींना पकडून योग्य ती शिक्षा मिळावी यासाठी जवळे ग्रामस्थांच्यावतीने मुख्य रस्त्यावर जवळे येथील बसस्थानकासमोर दीड तास रास्ता रोको करण्यात आला. तसेच संपूर्ण दिवस स्वयंस्फूर्तीने जवळे ग्रामस्थांच्यावतने सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अंत्यविधीसाठी मृतदेह जवळे येथे आणला असता स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेत जो पर्यंत आरोपीं मिळत नाहीत तो पर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी आमदार निलेश लंके घटनास्थळीच होते. त्यावेळी त्यांनी मध्यस्थी करत लवकरात लवकर आरोपी शोधून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांनी शांतता घेत जवळे येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.

अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन सदर घटनेची माहिती घेतली यावेळी त्यांनी सांगितले की पोस्टमार्टम मध्ये काय रिपोर्ट येतो त्यानुसार पुढील तपास करणे सोपे होईल व लवकरात लवकर आरोपी शोधण्यास मदत होईल.

पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी माहिती दिली की पूजाचा मृत्यू श्वास रोखून झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये आले आहे. पुढील तपासासाठी काही नमुने नाशिक येथे पाठवले आहेत. फिर्याद दाखल करून घेतली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात ३०२ कलम अंतर्गत गुन्हा(crime) दाखल केला आहे.

यावेळी सरपंच सौ अनिता सुभाष आढाव यांना बोलताना आपले अश्रू अनावर झाले. त्यावेळेस त्या म्हटल्या की मी एक महिला सरपंच म्हणून सर्व ग्रामस्थांना विनंती करते, की काल घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी प्रशासनाला मदत करावी तसेच माहिती द्यावी गावातील दिवसेदिवस अवैध व्यवसाय वाढत चालल्याने ते बंद झाले पाहिजेत पुरुषांनीही महिलांना काही समजत नाही हा गैरसमज काढून आम्हाला आमचे अधिकाराचा वापर करू द्या. पूजा रोकडे बाबत घडलेल्या घटनेतील आरोपी पोलीस प्रशासन यांनी महिलांच्या ताब्यात द्यावा आम्ही त्याला भर चौकामध्ये योग्य ती शिक्षा देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांच्या वतीने त्यांनी व्यक्त केले तसेच पूजाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवा जेणेकरून तिला योग्य तो न्याय मिळेल.

दिवसेदिवस आजचा तरुण व्यसनाधीन होत आहे असे प्रकार ही व्यसनाधीन तरुणांकडून होतात ते होऊ नये म्हणून गावातील अवैध व्यवसाय बंद झाले पाहिजेत तरच खरी पूजाला श्रद्धांजली होईल व गावाची संस्कृती टिकून राहिले-  उपसरपंच गोरख शिवाजी पठारे

जर दहा दिवसाच्या आत आरोपी सापडले नाही तर पुन्हा आम्ही रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे लवकरात लवकर आरोपीस आपण आमच्या ताब्यात द्यावे पोलीस प्रशासनाने तसेच पूजाला न्याय मिळावा म्हणून फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची संतप्त मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुकाध्यक्ष राजश्री कोठावळे यांनी यावेळी केली

रस्ता रोको प्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे  माजी सरपंच सुभाषराव आढाव जवळे ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य किसनराव रासकर माजी पोलीस पाटील बबनराव सालके संभाजी आढाव सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे, गोरख सालके, मुलीचे मामा तुषार ठुबे, सुवर्णा संजय सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य सोनाली सालके व ग्रामस्थांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

संतप्त महिलांच्या वतीने पोलीस निरीक्षक पारनेर घनश्याम बळप यांना निवेदन देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top