आजच्या दिवशी केलेले कार्य हे शेवटपर्यंत यशदायी असते.- रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी ढोक महाराज (कन्हैया ज्वेलर्स शुभारंभ प्रसंगी)

1

पारनेर/ प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील निघोज येथे विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर कन्हैया ज्वेलर्स या भव्य दुकानाचा उद्घाटन सोहळा रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी ढोक महाराज तसेच कन्हैया उद्योगसमूहाचे संस्थापक शांताराम मामा लंके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सकाळी ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते कलशपूजन व वास्तुपूजन करण्यात आले.

निघोज तसेच पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी उत्तम दर्जाचे शुद्ध सोने व चांदी मिळवण्यासाठी पारनेर, नगर, शिरूर याठिकाणी जावे लागायचे त्यामुळे त्यांचा खर्ची जाणारा वेळ वाया जाऊ नये म्हणून कन्हैय्या ज्वेलर्स या दुकानाचा दसर्‍याच्या निमित्ताने शुभारंभ केल्याचे सोमनाथ वरखडे यांनी संगितले. तसेच कन्हैया ज्वेलर्स हा निघोज मध्ये उत्तम पर्याय असून निघोजकर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी चांगला प्रतिसाद द्यावा असेही ते म्हणाले.

तसेच हरी भक्त परायण रामरावजी ढोक महाराज यांनी कन्हैया ज्वेलर्सचे संचालक सुदर्शन मुकुंद निघोजकर व कृष्णा सोमनाथ वरखडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी कन्हैय्या ज्वेलर्सचे संचालक सुदर्शन मुकुंद निघोजकर व कृष्णा सोमनाथ वरखडे यांनी उपस्थित मान्यवर, नातेवाईक, हितचिंतक यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

  1. निघोज येथील कुंड पर्यटन स्थळ हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.सर्व लोक हे स्थळ पाहण्यासाठी येतात पण रोड एकदम खराब झाल्याने लोकांना गाडी चालवताना फार कसरत करावी लागते.एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.तरी त्या बद्दल लोकप्रतिनिधी नी लक्ष द्यावे ही नम्र विनंती आहे

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top