भाळवणी येथे प्रीमियर लीगचे आयोजन

0

पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील भाळवणी येथे स्वर्गीय मेजर पैलवान अण्णासाहेब भुजबळ यांच्या सौजन्याने भाळवणी प्रीमियर लीगचे( premier league) आयोजन करण्यात आले आहे. या प्रीमियर लीगचे उदघाटन शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले व प्राध्यापक बबनराव भुजबळ सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाळवणी गावातील सर्व तरुण वर्ग व संघाचे मालक उद्घाटनसाठी उपस्थित होते. या प्रीमियर लीगची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून क्रिकेट च्या स्पर्धेला सुरवात करण्यात आली. या उदघाटन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, तुषार रोहकले, सुरज भुजबळ, नामदेव रोहकले, अक्षय रोहकले, प्राध्यापक बबनराव भुजबळ सर तसेच भाळवणी प्रीमियर लीग प्रथम बक्षीस 14,444  विकास रोहोकले, द्वितीय बक्षीस 9999 विकास रोहोकले, तृतीय बक्षीस 6666 विकास रोहोकले यांनी दिले आहे. तर या प्रीमियर लीगमध्ये एकूण सहा संघ खेळणार आहेत.  त्यामध्ये वैभव इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स भाळवणी, रानमेवा वॉरियर्स, डीजे सुपर किंग, क्रिश्ना लायस, नागेश्वर वारियर्स आधी सहा संघ खेळणार आहे. प्रत्येक संघाचे मालक यावेळी उपस्थित होते. त्यामधील संयोजक सुरेश भुजबळ,  मधुकर रोहोकले, दिलीप रोहोकले, संकेत रोहोकले, बच्चू सेठ रोहोकले, अमोल कोल्हे, महेश  रोहकले, बाबासाहेब रोहकले, संदीप शेठ रोहोकले, देवा कांबळे, अभिजीत काळे, विशाल उबाळ, तुषार शेठ रोहोकले, दिपक रोहोकले, जीतू पाटील रोहोकले, प्रमोद रोहकले, युवराज रोहकले, आदिनाथ भागवत, नाना शेठ चेमटे आदी संघमालक उपस्थित होते. तसेच भाळवणी गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top