AKOLE- ‘अन्नमाता’ भांगरे यांना मिळाला मानाचा पुरस्कार

0

अकोले/ प्रतिनिधी : तालुक्यातील 'अन्नमाता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई देवराम भांगरे यांना पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी व्यक्तिगत पातळीवर दिला जाणारा मानाचा प्लांट जीनोम सेव्हियर फार्मर रिवार्ड हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात भारताचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दीड लाख रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.



ममताबाई या गेली २० हुन अधिक वर्ष स्थानिक बियाणे संवर्धन आणि वृद्ध यांसाठी भरीव कार्य करत आहे. यामुळेच त्यांची देशपातळीवर दखल घेतली गेली. ममताबाई यांनी लाल रंगाचा लसूण, लांब व आरोग्यास पोषक असलेला दुधीभोपळा, डांगर भोपळा, मोहरी, भुईमूग, मका, विविध प्रकारचे परसबागेत लागवड योग्य भाजीपाला पिके, तेलबिया, डाळवर्गीय पिके यांच्या पारंपरिक वाणांचे संवर्धन केले आहे. तसेच त्यांनी अकोले तालुक्यात सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करताना त्यांनी गांडूळ खतापासून बनविलेल्या गोळ्या व गांडूळ खत वापरून बनवलेले सीडबॉल शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेले आहे. त्यांचा हाच प्रयोग देशभर गाजला. ममताबाई यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top